एक्स्प्लोर

Beed Crime Ex deputy sarpanch Death: गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणात खळबळजनक दावा, नर्तकी पूजा गायकवाड अन् राजकारण्यांनी मिळून...

Beed Crime Ex deputy sarpanch Death: गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांचे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गोविंदने पूजाला पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन आणि सात लाखांचा प्लॉट घेऊन दिला होता.

Beed crime news: बीडच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. गोविंद बर्गे यांचे कला केंद्रात नर्तकी असणाऱ्या पूजा गायकवाड (वय 21) हिच्याशी प्रेमसंबंध होते. गेल्या दीड वर्षांपासून या दोघांचे प्रेमकरण सुरु होते. मात्र, अलीकडच्या काळात या दोघांमध्ये बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडे गेवराईतील त्यांचा नवीन बंगला आपल्या नावावर करण्याची मागणी केली होती. तसे न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिने दिली होती. त्यामुळे गोविंद बर्गे नैराश्यात होते. सोमवारी रात्री ते बार्शी तालुक्यातील सासूर येथील पूजाच्या घरी गेले होते. यानंतर मंगळवारी सकाळी तिच्या घरासमोरच गाडीत गोविंद (Govind Barge Suicide) यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार आहे, असा दावा केला आहे. गोविंद बर्गे यांच्या भाच्याने या प्रकरणात राजकीय कनेक्शन असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

गोविंद बर्गे यांच्या भाच्याने एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की, माझा मामा हा निर्व्यसनी होता. त्याच्याकडे कधीही बंदूक नव्हती. हा काहीतरी मोठा कट असून माझ्या मामाला फसवण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून माझा मामा प्रचंड तणावात होता. काही राजकीय लोकांनीच माझ्या मामाची आणि पूजा गायकवाडची ओळख करुन दिली होती. त्यांनी कट रचून हे सर्व केले. पण आता वेगळेच चित्र दाखवले जात आहे, असा दावा गोविंद बर्गे यांच्या भाच्याने केला. आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या मामाला कोणतेही व्यसन नसताना त्याच्या गाडीत दारुच्या बाटल्या टाकण्यात आल्या, असेही बर्गे यांच्या भाच्याने म्हटले. गोविंद बर्गे हे त्यांच्यासोबत कधी साधी काठीही ठेवत नव्हते. मग त्यांच्याकडे पिस्तूल असण्याचा प्रश्नच येत नाही, असा ठाम दावा गोविंद बर्गे यांच्या इतर नातेवाईकांनी केला. त्यामुळे याप्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरुन डाव्या भागातून बाहेर पडली होती. त्यामुळे आता पोलिसांना गोविंद बर्गे यांच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामधून कोणती नवीन गोष्ट समोर येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांनी नर्तकी पूजा गायकवाड हिला अटक केली आहे. तिला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पूजा गायकवाड हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता तिच्या चौकशीतून काय माहिती बाहेर येणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

चार बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या अन् हातात पाचशेची नोट, सूचक वाक्य, पूजा गायकवाडचं ते इन्स्टाग्राम रिल व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Digital Arrest : आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget