एक्स्प्लोर

सरकारी सेवा अन् योजनांचं काम व्हॉट्अपवरुन, आपलं सरकारचं दुसरं व्हर्जन येतय; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

राज्यात सेवा आणि सुविधांसंदर्भातील डिजिटाइज पद्धतीचा पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. तर, 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा 1 मे पर्यंत पूर्ण करण्यात येतील

मुंबई : मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवा हमी कायदा केला होता, याची आपल्याला कल्पना आहे. आता आपले सरकारचे व्हर्जन जुने झाले असून आपण समग्र नावाच्या संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार, नागरिकांना कोणत्या योजनांची निकड आहे, याचा अभ्यास केला आहे. आता आपण डिजिटाइज (Digital) पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. लोकांकडून जी मागणी येते, त्यात सेवा आणि योजनांची मागणी येते. त्यामुळे, डिजिटाइज पद्धतीने सेवा देण्याचं काम सरकार सुरू करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. तसेच, नागरिकांना आता व्हॉट्सअपवर सेवा मिळणार आहेत, त्यामध्ये 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटाइज पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार आहे, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले.

राज्यात सेवा आणि सुविधांसंदर्भातील डिजिटाइज पद्धतीचा पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. तर, 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा 1 मे पर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सरकारकडील रेकॉर्ड वरुनच आपण माहिती भरणार आहोत. त्यामुळे, आपले सरकारचं हे दुसरं व्हर्जन येत आहे. त्यामध्ये, 4 टप्पे असतील, त्यामुळे नागरिकांना केलेला अर्ज सध्या कुठे आहे? हेही पाहाता येणार आहे. लोकांना डिजिटल सेवा मिळणं आणि प्रेडेक्टिबल होणार, व्हट्सॲपवर देखील सेवा उपलब्ध करुन देणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे, शासन दरबारी मारावे लागणारे खेटे कमी होतील, असेच दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील गुंतवणूक 1 लाख 500 हजार कोटी

महाराष्ट्रातील गुंतवणुकीत आपण जी आघाडी घेतली आहे, ती पुन्हा एकदा 1 लाख 500 हजार कोटींवर गेली असून याचे करार झाले आहेत. त्यामुळे, आज याचा आनंद वाटतो आहे, ज्यातून 47 हजार जणांना रोजगार मिळेल. डेटा सैंटरची उभारणी रायगडमध्ये होईल, नाशिकमध्ये नंदूरबारमध्ये 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, ज्यातून 600 लोकांना रोजगार मिळेल. विदर्भात रिलायन्स फूड पार्क आणि शीतपेय पार्क तयार करणार आहोत. तिथे 1500 कोटींची गुंतवणूक करणार आहत. अदानींची देखील 70 हजार कोटींची गुंतवणूक असणार आहे, असे म्हणत राज्यातील उद्योजकीय गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्‍यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

कर्नाटक सरकारने मेट्रो स्टेशनचे नाव बदलले

कर्नाटकातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या नामांतवरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी स्टेशन करण्याचा मी निषे करतो. कर्नाटक सरकार शिवाजी महाराजांचा अपमान करत आहे. पण, शिवाजी महाराजांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरु हे पंतप्रधान असण्यापासून आहे, असा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. तसेच, डिसकव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरुंनी लिहिलं होतं, त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे जे मत व्यक्त केलं होत, हे आपल्याला माहिती आहे. काग्रेसच्या सरकारमध्ये सातत्याने तीच परंपर दिसत आहे. ईश्वराने काग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी. धार्मिक विरोधी व्यवस्था उभी करत ते तेढ निर्माण करणार नाहीही माझी अपेक्षा आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.

हा जीआर सरसकट आरक्षण देत नाही

मराठा आरक्षण व हैदराबाद गॅझेटियरच्या विरोधात ओबीसी नेत्यांकडून याचिका करण्यात आली आहे. त्यावर, बोलताना फडणवीस म्हणाले की, याचिका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही विचार करुन जीआर काढला आहे, कोणालाही सरसकट आरक्षण हा जीआर देत नाही. पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच हा जीआर मदत करतो. मी ओबीसी समाजातील नेत्यांना सांगू इच्छितो कोणालाही सरसकट आरक्षण दिलेलं नाही, पुरावा तपासूनच आरक्षण मिळणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर, ओबीसींच्या मुंबई मोर्चावर बोलताना, राजकीयदृष्टीने कोणाला काम करायचं असेल तर थांबवू शकत नाही. मात्र, जोपर्यंत आमचं सरकार आहे, आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले.

नेपाळ देश अराजकता

नेपाळमधील अराजकतेवरुन विरोधकांनी केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय. अलिकडच्या काळात जो विरोधी पक्ष आहे, त्यांनी विरोधाची अशी पातळी गाठली आहे. ते आता देशविरोधी, व्यक्तीविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. विरोधी पक्षाने भूमिका घ्यायची असते, त्यांनी पॉलिसी, योजनांचा विरोध करावा. मात्र, देशाचा विरोध त्यांनी करु नये, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला.

हेही वाचा

Video: शिवरायांचा अपमान करण्याची पंरपरा काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरुंपासून; CM फडणवीसांनी सांगितला इतिहास

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
Embed widget