(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Railway Jobs 2022: सरकारी नोकरीची संधी! भारतीय रेल्वेत क्रीडा कोट्याअंतर्गत भरती, लगेच करा अर्ज
Indian Railway Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे.
Indian Railway Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वेत क्रिडा कोट्याअंतर्गत भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेत नोकरी करणाऱ्या इच्छुक असणारे उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरेल.
दक्षिण पूर्व रेल्वेद्वारे क्रीडा कोट्याअंतर्गत 21 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rrcser.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करावेत. उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे दरम्यान असावं. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फ्रेब्रुवारी आहे.
अर्ज प्रक्रिया
- इच्छुक उमेदवारांनी प्रथम rrcser.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- होम पेज उघडल्यानंतर भरती संबंधित लिंकवर क्लिक करावे.
- आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावे.
- संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर अर्ज पत्र डाऊनलोड करावं
अर्ज शुल्क
UR/OBC साठी परीक्षा शुल्क ₹500/- आहे आणि SC/ST/PwD श्रेणीतील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹250/- आहे. बँक ड्राफ्ट/आयपीओ FA आणि CAO, साउथ ईस्टर्न रेल्वे, गार्डन रीच-700043 डिपॉझिट करावा.
महत्वाची माहिती
ईशान्येकडील राज्ये, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर, लाहौल आणि स्पिती जिल्हा आणि हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील पांगी उपविभाग, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमधील रहिवाशांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2022 आहे.
हे देखील वाचा-
- Infosys Recruitment 2022 : IT इंडस्ट्रीमध्ये नोकरी शोधताय? मग 'ही' संधी सोडू नका, इन्फोसिसमध्ये 55 हजार लोकांची भरती
- SEBI Recruitment 2022 : सेबीमध्ये मोठी भरती; लगेचच अर्ज करा, संधी सोडू नका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha