(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold : सोन्याला झळाळी! गेल्या वर्षांच्या तुलनेत या वर्षी 350 टन जास्त सोने विक्री होण्याचा अंदाज
गेल्या दोन महिन्यात देशात 25 लाखांपेक्षा जास्त लग्न झाली आणि त्याचा थेट परिणाम सोने खरेदीवर झाला. त्यामुळे 2021 मध्ये सुमारे 900 टन सोन्याच्या आयातीचा अंदाज आहे.
मुंबई : एक काळ असा होता की घराघरात गुंतवणूक ही सोन्यामध्ये केली जायची. घरातल्या अडी-अडचणीच्या काळामध्ये एक तरी सोन्याचा दागिना असावा असं त्या जमान्यात वाड-वडील म्हणत असत. त्यामुळं त्या काळात सोने खरेदीकडे लोकांचा कल होता. गेल्या काही काळात सोन्याच्या खरेदीचं लोण कमी झालं होतं. पण अलिकडे सोने खरेदीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं चित्र दिसू लागलंय. यंदाच्या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत गेल्या वर्षांच्या तुलनेत 350 टन जास्त सोने विक्री होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यंदाची सोने विक्री ही गेल्या दहा वर्षांमधली सगळ्यात जास्त असेल असं म्हटलं जातंय.
या वर्षीच्या शेवटापर्यंत 900 टन सोनं आयात करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. ही आयात विक्रमी असल्याचं सांगण्यात येतंय. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये लग्नं ही साध्या पद्धतीने करण्यात आली होती. या वर्षीपासून पुन्हा एकदा धडाक्यात लग्न लागली. या वर्षीच्या विक्रमी लग्नांमुळे विक्रमी सोने खरेदी झाल्याचं दिसून आलं आहे.
गेल्या दोन महिन्यात देशात 25 लाखांपेक्षा जास्त लग्न झाली आणि त्याचा थेट परिणाम सोने खरेदीवर झाला. त्यामुळे 2021 मध्ये सुमारे 900 टन सोन्याच्या आयातीचा अंदाज आहे. हा आकडा गेल्या सात वर्षांमधला सर्वाधिक मोठा असेल.
गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या रुपात जगावर आर्थिक संकट आलं. देशातही अनेक उद्योग बंद पडले. कोट्यवधी जनता आर्थिक संकटात सापडली. त्याचा थेट परिणाम सोने खरेदीवर झाला. कोरोना काळात नवीन सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या घटली होती. तरीही सोने खरेदीचा वार्षिक आकडा हा 650 टन होता.
लॉकडाऊननंतर सराफा दुकानं सुरु झाली. सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. त्याला कारण ठरली ही विक्रमी लग्न. दुसरीकडे सोन्याचे दर घटल्याने विक्रीत वाढ झाल्याचा अंदाज आहे. कारणं काहीही असो, सोन्याला आणि सोने उद्योगला नवी झळाली मिळालीय.
संबंधित बातम्या :
- Gold : सोने विक्रेत्यांनो सावधान...आजपासून विना हॉलमार्क सोनं विक्री केल्यास कारवाई होणार
- Gold Import Duty : सोन्यावरील आयात शुल्क चार टक्के करण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या काय होणार परिणाम
- Pune : महिलेचा पुण्यातील नामांकित 12 सराफांना गंडा; हातचलाखीच्या या खेळाचा शेवट तुरुंगात