(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Weekly Lucky Zodiacs 02 To 08 December 2024 : डिसेंबरचा पहिला आठवडा काही राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या काळात 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.
Weekly Horoscope 02 To 08 December 2024 Lucky Zodiacs : डिसेंबरचा पहिला आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. खरं तर, 02 डिसेंबरपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात अनेक शुभ योग तयार होत आहेत, हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा खूप फायदेशीर असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरी आणि करिअर, व्यवसाय इत्यादीसाठी चांगल्या संधी मिळतील. या आठवड्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तसेच, या आठवड्यात नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचंही पूर्ण सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्या मदतीने तुमची अनेक प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तसेच, या आठवड्यात तुमचं वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुमचं आरोग्य या महिन्यात सामान्य राहणार आहे.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा शुभ ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित काही प्रवास करावा लागू शकतो. अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता. परंतु, जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे तुम्हाला यश मिळू लागेल. तसेच, तुमचे मित्र आणि कुटुंब तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमच्या कुटुंबाच्या पाठिंब्याने तुम्ही या आठवड्यात अनेक मोठ्या समस्यांना सहज सामोरं जाल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. फक्त त्याबद्दल निष्काळजी होऊ नका.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा प्रगतीचा असेल. नोकरदार लोकांच्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो. तसेच, या आठवड्यात तुम्हाला एखाद्या मित्राच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. नोकरदार महिलांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कोणत्याही मालमत्तेच्या मदतीने मोठे आर्थिक लाभ मिळवण्यात यशस्वी व्हाल. तसेच या आठवड्यात तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवाल आणि त्याला खुश ठेवाल. वैवाहिक जीवन आनंदात जाईल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
डिसेंबरचा पहिला आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप भाग्याचा असेल. कारण, या आठवड्यात तुम्हाला त्या सर्व संधी मिळणार आहेत ज्यांची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून, विशेषतः तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तथापि, विद्यार्थ्यांना परीक्षा स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आठवड्याच्या शेवटी तुम्ही अशा व्यक्तीला भेटाल, जो तुम्हाला भविष्यात मोठे फायदे मिळवून देईल. तसेच, या आठवड्यात नोकरदार लोकांना इच्छित पदोन्नती किंवा बदली मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या काही मोठ्या यशामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी बरीच धावपळ करावी लागू शकते. या काळात तुमचा प्रिय मित्र किंवा काही प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुमचे दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होईल. या आठवड्याच्या शेवटी व्यवसायाच्या संदर्भात केलेल्या प्रवासामुळे तुम्हाला नफा मिळू शकेल. जर तुम्हाला या आठवड्यात तुमचं प्रेम एखाद्यासमोर व्यक्त करायचं असेल, तर तुम्ही या आठवड्यात प्रेम व्यक्त करू शकता. तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तसेच, आज तुम्ही कुटुंबासोबत पर्यटनस्थळी जाण्याचा प्लॅन करू शकता. या आठवड्यात तुमचं आरोग्य सामान्य राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :