एक्स्प्लोर
गोव्यात समुद्रात अडकलेल्या जहाजातून चौघांची थरारक सुटका
गोव्यातल्या कसिनो शिपवरुन चौघा जणांची सुटका करण्यात आली. समुद्रात अडकलेल्या एम व्ही लकी सेव्हन या जहाजावरुन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने चौघांना वाचवण्यात आलं.

पणजी : गोव्यातल्या कसिनो शिपवरुन चौघा जणांची सुटका करण्यात आली. समुद्रात अडकलेल्या एम व्ही लकी सेव्हन या जहाजावरुन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने चौघांना वाचवण्यात आलं. पणजीजवळ मीरामार बीचवर एम व्ही लकी सेव्हन हे जहाज समुद्रात अडकलं होतं. त्यावरील चार कर्मचाऱ्यांना अचानक त्रास सुरु झाला. त्यापैकी एकाचा हात मोडला होता, तर तिघांना उलट्या आणि चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला. पणजीहून निघालेल्या कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टनं या चौघांची सुखरुप सुटका करण्यात आली. त्यांना मीरामारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















