Uttarakhand Glacier Burst: भूस्खलनामुळे हिमकडा कोसळला, ICIMOD च्या वैज्ञानिकांचा अहवाल सादर
उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात एक भलामोठा हिमकडा कोसळल्याने जवळपास 70 लोकांना प्राण गमवावे लागले. 135 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत.
नवी दिल्ली : उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात गेल्या महिन्यात एक भलामोठा हिमकडा कोसळल्याने मोठं नुकसान झालं होतं. हिमकडा कोसळल्याने पूर आल्याने मोठी जीवितहानी आणि आर्थिक नुकसान झालं होतं. धौली गंगा, ऋषी गंगा आणि अलकनंदा नद्यांमध्ये झालेल्या हिमस्खलन आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे अनेक घरं वाहून गेली. या नैसर्गिक आपत्तीत जवळपास 70 लोकांना प्राण गमवावे लागले. 135 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. उत्तराखंडमधील ही घटना का घडली याबाबतचा खुलासा आता झाला आहे.
इंटरनॅशनल माउंटन फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंटने ( ICIMOD) शुक्रवारी सांगितलं की, ही घटना मोठ्या रॉक स्लाईडमुळे घडली आहे. म्हणजेच मोठमोठ्या दगडांची घसरण झाल्याने ही घटना घडली आहे. या अहवालानुसार, रोंटी शिखराच्या अगदी खाली बर्फ वितळल्याने रॉकस्लाईडिंग झालं.
Uttarakhand Glacier Burst: उत्तराखंड बचावकार्य; 56 जणांचे प्रेत सापडले तर 149 जण अद्याप बेपत्ता
इंटरनॅशनल माउंटन फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार, असं दिसून आलं आहे की 22 दशलक्ष घनमीटर दगडं बर्फात कोसळले. यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाढला आणि अत्यंत कमी वेळेत पूरस्थिती निर्माण झाली. इंटरनॅशनल माउंटन फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट या संघटनेत आठ सदस्य आहेत ज्यामध्ये चीन, नेपाळचा सदस्यांचाही समावेश आहे.
13 गावांचा संपर्क तुटल्याने नव्या पुलाची निर्मिती
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील 13 गावांचा संपर्क पुरामुळे तुटला होता. या गावांना जोडण्यासाठी ऋषीगंगा नदीवर पर्यायी बेली ब्रिज बांधण्यात आला आहे. सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) शिवालिक प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए.एस. राठोर यांनी सांगितले की, या पुलाचे बांधकाम 20 फेब्रुवारीपासून सुरू झाले असून 20 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. परंतु बीआरओने रात्रंदिवस काम करुन वेळेआधीच हे काम पूर्ण केले. शुक्रवारी चाचणीनंतर नव्याने बांधलेला बेली ब्रिज लोकांसाठी खुला झाला आहे.
Uttarakhand | कोई है... ? अहोरात्र मेहनत घेत तपोवन बोगद्यात ITBPच्या 'हिमवीरां'कडून शोधमोहिम