राहुल गांधींकडे अध्यक्षपदाची जबाबदारी द्या, बैठकीत नेत्यांची मागणी
सोनीया गांधी यांच्या घरी जवळपास 5 तास चालेल्या या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पवन बंसल म्हणाले, पक्षाला राहुल गांधी यांची गरज आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या वेळी बैठकीला संबोधीत केले.
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या पक्षसंघटनेत बदल केले जातील असं सतत बोललं जातं. परंतु गेली काही वर्षं कॉंग्रेस मधील बदलांची फक्त चर्चा होत आली आहे. आज देखील सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांची दिल्लीत जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये कोणताही ठोस निर्णय न होता पुन्हा एकदा शिमला किंवा पंचमढी या ठिकाणी चिंतन शिबिर घ्यायचं ठरवलं गेलंय. निर्णय रेंगाळत ठेवण्यामुळे कॉंग्रेसमध्य वरपासून खालपर्यंत वर्षषानुवर्ष तीच तीच लोकं पदांवर असल्याच दिसुन येतंय. पक्ष देईल ती जबाबदाकी स्वीकारयला तयार आहे, असे राहुल गांधी या वेळी म्हणाले. राहुल गांधींच्या या वक्त्व्यानंतर बैठकीत टाळ्याचा कडकडाट झाला.
या बैठकीत कॉंग्रेस पक्षाला बळकट करणे आणि नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे या विषयांवर चर्चा झाली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक पुढच्या वर्षी जानेवारीच्या शेवटी होणार आहे.
जवळपास 5 तास चालेल्या या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पवन बंसल म्हणाले, पक्षाला राहुल गांधी यांची गरज आहे. बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी आपले मत मांडले. बैठकीत सोनिया गांधींसह एकूण 19 नेते उपस्थित होते. कॉंग्रेसच्या धोरणांवर नाराज असलेले नेते देखील या वेळी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सकारात्मक वातावरणात बैठक झाली. पक्षाच्या मजबूतीसाठी काही मुद्दे उपस्थित केले गेले. वर्किंग कमिटीची बैठक नियमीत होणार आहे. कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या होत्या.
ऑगस्ट महिन्यात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांच्या सहित कॉंग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला सक्रिय अध्यक्षाची गरज आणि व्यापक संघटनात्मक बदल करावा अशी मागणी केली होती. यावर काही कॉंगेस नेत्यांनी गांधी परिवाराच्या वर्चस्वाला आव्हान दिलं गेलं असल्याचं मत व्यक्त केलं होतं. अनेकांनी गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली होती.