एक्स्प्लोर

Gaganyaan Mission : 2023 मध्ये गगनयान अंतराळात जाणार, जाणून घ्या कशी असेल भारताची पहिली मानवी मोहीम

Gaganyaan Mission : 2023 मध्ये भारताची पहिली मानवी मोहीम अंतराळात जाऊ शकते. कशी असेल भारताची पहिली मानवी मोहीम?

Gaganyaan Mission : भारतीय अंतराळ संस्था इस्रोने(Indian Space Agency ISRO) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी गगनयानची (Gaganyaan Mission) तयारी केली आहे. 2023 मध्ये भारताची पहिली मानव मोहीम अंतराळात जाईल. या मोहिमेत भारतातील तीन अंतराळवीरही असतील.

2023 मध्ये गगनयानच्या प्रत्यक्ष उड्डाण करण्यापूर्वी तीन चाचणी मोहिमा देखील केल्या जातील. या तीन चाचणी मोहिमा मानवरहित असतील, त्यावेळी भारताकडून एक ह्युमनॉइड रोबोट पाठवला जाईल. त्यामुळेच इस्रोने 'व्योमित्र' नावाचा महिला रोबोट तयार केला असून तो संशोधनानंतर अवकाशात पाठवला जाणार आहे. हा 'हाफ-ह्युमनॉइड' (मानवी) रोबोट अवकाशातून आपला रिपोर्ट इस्रोला पाठवणार आहे.

गगनयानशी संबंधित एक्स्पोचे आयोजन

आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत, इस्रोने शाळकरी मुले आणि सामान्य लोकांसाठी गगनयानशी संबंधित एका एक्सपोचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये लोकांना यासंबंधी माहिती दिली जाईल. माहितीनुसार, HLVM3 हे मिशन त्याच्यासोबत उड्डाण करेल. HLVM3 हे GSLVMk3 सारखेच आहे परंतु यामध्ये आपत्कालीन क्रू एस्केप सिस्टम आहे. त्यामुळे त्याला GSLV मार्क 3 ऐवजी HLVM 3 असे नाव देण्यात आले आहे

क्रू एस्केप सिस्टमच्या अगदी खाली ओएम (ऑर्बिटल मॉड्यूल) असेल. या ऑर्बिटल मॉड्यूलचे दोन भाग असतील, ज्यामध्ये क्रू मॉड्यूल वरच्या भागात असेल आणि सर्व्हिस मॉड्यूल खालच्या भागात असेल. क्रू मॉड्युलमध्ये भारतातील तीन अंतराळवीर असतील. त्याची आतील बाजू धातूची रचना आणि बाहेर थर्मल संरक्षण प्रणालीसह बनलेली आहे. यासोबतच प्रवाशांसाठी लाइफ सपोर्ट सिस्टीम, फूड पॅकेट्स, पाण्याचे पाऊच यांसारख्या अन्न आणि पाणी व्यवस्थापन यंत्रणाही असेल. मानवी कचरा व्यवस्थापन, जसे की क्रू जैविक उत्पादने, अन्न, कपडे आणि पॅकेजिंग कचरा गोळा करणे आणि साठवणे, या सुविधा असतील. याशिवाय केबिन प्रेशर कंट्रोल सिस्टीम, फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम असणार आहे.

तीन अंतराळवीरांना 15 दिवस अंतराळात पाठवले जाईल

भारत आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेत अंतराळवीरही पाठवणार आहे, 3 दिवस अंतराळात पाठवले जाईल. जे सुमारे 400 किमी उंचीवर कक्षेत राहील. हे मिशन 3 दिवस अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतणार आहे. भारताच्या समुद्रातून खाली उतरल्यानंतर ते पुनर्प्राप्त केले जाईल.

या मोहिमेसाठी वेगवेगळ्या चाचण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट, टेस्ट व्हेईकल मिशन्स, पॅड अॅबॉर्ट टेस्ट, मानवरहित उड्डाण या सगळ्यानंतर अखेर भारताची मानवयुक्त मोहीम अवकाशात पाठवण्यात येणार आहे. यासाठी इस्रोने डीआरडीओच्या मदतीने भारतीय अंतराळवीरांसाठी एक खास सूट तयार केला आहे.

कोरोनामुळे मिशनला विलंब

भारताने डिसेंबर 2014 मध्ये प्रथमच चाचणीसाठी हे क्रू मॉड्यूल पाठवले होते. पृथ्वीपासून 126 किमी अंतरावर गेल्यानंतर ते पुन्हा प्रवेश करून बंगालच्या उपसागरात पसरले होते. ती मानवरहित चाचणी होती. त्यावेळी या योजनेनुसार तो अंदमानच्या समुद्राजवळून रिकव्हर केले होते. ISRO ने या मिशनसाठी अनेक राष्ट्रीय सहकार्य देखील केले आहे. ज्यामध्ये IMD, BARC, DRDO, CSIR, भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल, भारतीय वायुसेना, IIT मद्रास कानपूर आणि पाटणा, IIST, NIOT, IISc या इतर संस्थांचा समावेश आहे. हे मिशन भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लॉन्च करण्याची योजना होती, परंतु कोविड-19 मुळे हे मिशन लांबले. आता पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 2023 मध्ये हे अभियान पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी इस्रोची वैज्ञानिकांची टीम अहोरात्र झटत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल
''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2024 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2024 | गुरुवार
T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं निश्चित, पंत-पांड्याचं काय होणार?
T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं निश्चित, पंत-पांड्याचं काय होणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 18 April 2024 : ABP MajhaJitendra Awhad Tondi Pariksha : राष्ट्रवादीतून फुटून गेलेल सर्वजण पाकीटमार, दरोडेखोर:जितेंद्र आव्हाडABP Majha Headlines : 07 PM : 18 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल
''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2024 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2024 | गुरुवार
T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं निश्चित, पंत-पांड्याचं काय होणार?
T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं निश्चित, पंत-पांड्याचं काय होणार?
दाऊद अन् छोटा शकील बेरोजगार झाल्याने एकनाथ खडसेंना धमक्या देताहेत, त्यांना झेड सिक्युरिटी द्या; नाथाभाऊंना चंद्रकांत पाटलांचा टोमणा
दाऊद अन् छोटा शकील बेरोजगार झाल्याने एकनाथ खडसेंना धमक्या देताहेत, त्यांना झेड सिक्युरिटी द्या; नाथाभाऊंना चंद्रकांत पाटलांचा टोमणा
Raksha Khadse : नाथाभाऊनंतर आता रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य
नाथाभाऊनंतर आता रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य
बुमराह, सूर्या की रोहित, अर्शदीप, कुणाला कॅप्टन कराल? PBKS vs MI सामन्यात मालामाल करणारे 11 खेळाडू 
बुमराह, सूर्या की रोहित, अर्शदीप, कुणाला कॅप्टन कराल? PBKS vs MI सामन्यात मालामाल करणारे 11 खेळाडू 
Dubai floods : दुबईची तुंबई का झाली; कृत्रिम पाऊस अंगलट आला की हवामान बदलाने दणका दिला? नेमकं काय घडलं??
दुबईची तुंबई का झाली; कृत्रिम पाऊस अंगलट आला की हवामान बदलाने दणका दिला? नेमकं काय घडलं??
Embed widget