Gaganyaan : इस्रोची महत्वाकांक्षी अंतराळ मोहिम, 21 ऑक्टोबरला 'गगनयान'ची पहिली उड्डाण चाचणी
ISRO Gaganyaan Mission : इस्रो (ISRO) 21 ऑक्टोबर रोजी पहिली चाचणी उड्डाण प्रक्षेपित करणार आहे. या चाचणीद्वारे अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल.
Gaganyaan Mission Update : इस्रो (ISRO) गगनयान मिशन (ISRO Gaganyaan Mission) अंतर्गत पहिले चाचणी उड्डाण प्रक्षेपित केलं जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था गगनयान मिशन अंतर्गत 21 ऑक्टोबर रोजी चाचणी उड्डाणे सुरू करणार आहेत, इस्रोने याबाबत माहिती दिली आहे. गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. हाच यामागचा मूळ उद्देश आहे. चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेले जाईल. यासह ते पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल.
गगनयान मिशन अंतर्गत पहिली चाचणी
इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने दिलेल्या माहितीनुसार, गगनयान अंतराळ मोहिमेअंतर्गत 21 ऑक्टोबर रोजी पहिली अबॉर्ट टेस्ट करण्यात येणार आहे. क्रू एस्केप सिस्टीमची इनफ्लाइट अॅबॉर्ट टेस्ट (Abort Test) टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) द्वारे घेतली जाईल.
अंतराळवीरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी चाचणी
गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा त्याचा उद्देश आहे. चाचणी दरम्यान गगनयानचं मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर आणलं जाईल. मॉड्यूलने ठराविक उंची गाठल्यानंतर ते पृथ्वीवर परत आणण्यासाठी बंगालच्या उपसागरात उतरवलं जाईल.
गगनयान मोहिमेतील आणखी तीन योजना
ISRO ने ट्विटर एक्सवरील पोस्टमध्ये मिशन गगनयानबाबत माहिती देत सांगितलं की, गगनयान मोहिमेची TV-D1 चाचणी उड्डाण 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केली जाणार आहे. त्याआधी इस्रोचे प्रमुख सोमनाथ म्हणाले होते की, पहिल्या चाचणी उड्डाणानंतर या मोहिमेतील D2, D3, D4 या आणखी तीन चाचणी मोहिमांची योजना आखण्यात आल्या आहेत.
भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम
गगनयान मोहिम इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. गगनयान हे भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहीमे अंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलातील वैमानिक अंतराळवीर म्हणून अंतराळात जातील. यासाठी त्यांचं प्रशिक्षणही सुरू आहे. गगनयान अंतराळ मोहिमेसाठी पहिले रोबोट तयार केले जात आहेत. आधी रोबोटिक चाचणी होईल त्यानंतर मानवाला अंतराळात पाठवलं जाईल.