PM Modi : PM Modi : 2025 पर्यंत मानव अंतराळात, 2040 मध्ये भारत चंद्रावर पाऊल ठेवणार; पंतप्रधान मोदींचं लक्ष्य
Gaganyaan Mission : गगनयान मोहिम 2025 पर्यंत पूर्ण होईल, 2035 मध्ये अंतराळ स्थानकापर्यंत मजल आणि 2040 पर्यंत मानव चंद्रावर पाऊस ठेवले, हे पंतप्रधान मोदींचं लक्ष्य आहे.
ISRO Gaganyaan : भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम गगनयान सध्या प्रगती पथावर आहे. इस्रो (ISRO) च्या गगनयान (Gaganyaan) मोहिमेच्या (ISRO Space Mission) प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी गगनयान मोहिमेचा आढावा घेतला आणि इस्रोसह मिळून महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, 2025 पर्यंत भारतीय अंतराळवीर अंतराळात पोहचतील, तर 2035 अंतराळ स्थानकावर जातील, त्यानंतर 2040 पर्यंत मानवी चंद्र मोहिम हे भारताचं लक्ष्य आहे.
पंतप्रधान मोदींकडून गगनयान मोहिमेची आढावा बैठक
पंतप्रधान कार्यालय (PMO) ने मंगळवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयानच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि देशाच्या अंतराळ संशोधन महत्वाकांक्षेचा भविष्यातील मार्ग तयार करण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. भारताच्या अंतराळ प्रयत्नांच्या महत्त्वपूर्ण विकासाचा आढावा घेण्यात आला.
मोहिमेची रुपरेषा ठरवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक
भारताच्या गगनयान मिशनच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी एका उच्चस्तरीय बैठकीला हजेरी लावली, या बैठकीचं अध्यक्षपद पंतप्रधानांकडे होते. भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांच्या भविष्याची रूपरेषा ठरवण्यासाठी ही उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतीय अंतराळ विभागाने गगनयान मोहिमेचा सर्वसमावेशक अहवाल आणि योजना सादर केली. इस्रोने गगनयान मोहिमेमध्ये मानवी रेटेड लॉन्च व्हेइकलच्या 3 अनक्रियूड मोहिमांसह सुमारे 20 प्रमुख चाचण्या नियोजित केल्या आहेत. क्रू एस्केप सिस्टम चाचणी वाहनाची पहिली प्रात्यक्षिक उड्डाण 21 ऑक्टोबरला होणार आहे.
क्रू मॉडेल वापरून चाचणी
इस्रोच्या महत्वाकांशक्षी मानवी अंतराळ मोहिमेची सध्या तयारी सुरु आहे. गगनयानच्या तयारीचा एक भाग म्हणून 21 ऑक्टोबर रोजी पहिले चाचणी वाहन अबॉर्ट टेस्ट केली जाणार आहे. शनिवारी सकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान पहिले चाचणी वाहन TV-D1 लाँच करण्यात येईल. TV-D1 टेस्ट गगनायन मिशनमीधील पहिली प्रेक्षपण चाचणी आहे. गगनयान मिशनसाठी TV-D1 इस्रो एक क्रू मॉडेल वापरून इस्रो चाचणी पूर्ण करेल. मानवांना अंतराळात पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे हा या चाचणीचा मूळ उद्देश आहे.