एक्स्प्लोर
जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनात चार जवान शहीद, एक बेपत्ता
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा भागात झालेल्या हिमस्खलनामध्ये भारतीय लष्कराचे 4 जवान शहीद झाले आहेत. तर, एक जवान बेपत्ता आहे.
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये मागच्या 48 तासांपासून प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. कुपवाडामधील माछिल सेक्टरमध्ये हिमस्खलन झाले आहे. या दुर्घटनेत लष्कराचे पाच जवान दबले गेले असून चार जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. तर, एक जवान अद्याप बेपत्ता आहे. एलओसी जवळ कुपवाडाच्या मच्छल सेक्टरमध्ये हिमवादळ आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजूनही काही जवान बंकरमध्ये अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जम्मू काश्मीरच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. श्रीनगरमध्येही बर्फवृष्टीमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. बर्फवृष्टी आणि पावसामुळे दळणवळण विस्कळीत झालं आहे. तर, बर्फवृष्टीमुळे सगळीकडेच बर्फाची चादर पसरली आहे. श्रीनगरमध्ये सहा इंचांपर्यंत जाडीचा थर तयार झाला आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरमधील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. श्रीनगरमध्ये तर तापमान शून्य डिग्रीपर्यंत पोहचले आहे. बर्फवृष्टीमुळे श्रीनगरला ये-जा करणाऱ्या अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये आजही बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या : Karad | शहीद संदीप सावंत यांच्यावर आज अंत्यसंस्कार | ABP MajhaArmy Sources: Due to heavy snowfall in the last 48 hours, there have been multiple avalanches in the North Kashmir areas after which a number of soldiers have been rescued. 3 soldiers have lost their lives while one is still missing. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) January 14, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement