Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या चार दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त
बारामुल्ला आणि पुलवामा येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी 4 दहशतवाद्यांना अटक केल्याची घटना घडली. हे चारही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या संघटनेचे आहेत.
Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला आणि पुलवामा येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी 4 दहशतवाद्यांना अटक केल्याची घटना घडली. हे चारही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या संघटनेचे आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, सुरक्षा दलाच्या जवानांनी सोपोरमधील रफियाबादच्या नदिहाल भागाला वेढा घालून शोध मोहीम सुरु केली होती. या मोहिमेदरम्यान लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित संघटनेच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांची अहमद वानी, अमीर नजीर हजार, सुहेल अहमद भट आणि बशीर अहमद गनी यांचा मुलगा नसीर हुसेन अशी नावे आहेत. त्यांच्याकडून एके-56 रायफल, शस्त्रास्त्रे आणि 30 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अटक करण्यात आलेले तीन दहशतवादी हे लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून ग्रेनेड आणि एके-47 रायफलसह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासादरम्यान ते दहशतवादी आरिफ हजार उर्फ रेहानचे सहकारी म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या व्यस्त अमीरा कादल पुलावर रविवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी आणकी दोघांना अटक केली आहे. या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून, 36 जण जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोहम्मद बारीक नावाच्या पहिल्या आरोपीला खानयार येथून अटक करण्यात आली असून, प्राथमिक चौकशीनंतर दुसरा आरोपी फाजील नबी सोफी यालाही अटक करण्यात आली आहे. ग्रेनेड हल्ल्यात वापरलेली दुचाकीही विशेष तपास पथकाने (एसआयटी) जप्त केली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच ही एसआयटी स्थापन करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या:
- The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स' सिनेमा पाहिल्यानंतर जम्मूवासियांचे डोळे पानावले, अश्रू अनावर
- बोगस प्रमाणपत्राद्वारे मिळालेली सरकारी नोकरी टिकवण्यासाठी खटाटोप? 'बोगस प्रमाणापत्रांद्वारे नोकरी मिळवलेल्यांनी स्वतःहून कळवा', क्रिडा विभागाचं आवाहन