बोगस प्रमाणपत्राद्वारे मिळालेली सरकारी नोकरी टिकवण्यासाठी खटाटोप? 'बोगस प्रमाणापत्रांद्वारे नोकरी मिळवलेल्यांनी स्वतःहून कळवा', क्रिडा विभागाचं आवाहन
पुणे : बोगस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांची नोकरी वाचवण्यासाठी खटाटोप सुरु असल्याचं दिसून येत आहे. क्रिडा विभागाने बोगस अधिकाऱ्यांनी स्वतःहून विभागाला सांगितल्यास त्यांची नावे गुप्त ठेवण्याते येतील, असं म्हटलं आहे.
पुणे : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याची अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. महाराष्ट्र क्रिडा विभागाकडून बोगस कागदपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्यांविरोधात प्रमाणपत्र पडताळणी मोहिम राबवली आहे. मात्र, बोगस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांची नोकरी वाचवण्यासाठी खटाटोप सुरु असल्याचं दिसून येत आहे. क्रिडा विभागाने बोगस अधिकाऱ्यांनी स्वतःहून विभागाला सांगितल्यास त्यांची नावे गुप्त ठेवण्याते येतील, असं म्हटलं आहे.
बोगस क्रिडा प्रमाण पत्रांच्या आधारे शासकीय नोकरी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी क्रिडा खात्याने अशा अधिकाऱ्यांनी त्यांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचं स्वतःहून क्रिडा विभागाला कळवावं असं आवाहन केलंय. बोगस क्रिडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांनी ते बोगस पद्धतीने सरकारी नोकरीत आलेत हे सांगण्याचा प्रामाणिकपणा दाखवल्यास त्यांची नावं गुप्त ठेवण्यात येणार आहेत. अशा बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणार्यांना नोकरी टिकवता यावी यासाठी हा खटाटोप सुरु आहे.
क्रिडा विभागाने 'बोगस क्रिडा प्रमाणपत्र आणि बोगस क्रिडा प्रमाणपत्र पडताळण अहवाल समर्पन योजना' या नावाने योजना जाहीर केली असुन या अंतर्गत 31 मेपर्यंत बोगस क्रिडा प्रमाणपत्र आणि पडताळणी अहवाल क्रिडा विभागाकडे बंद लिफाफ्यात पाठवण्यास सांगण्यात आलंय. राज्याचे क्रिडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी हे आदेश दिलेत. मात्र यामुळे ज्यांनी खेळांमधे खरच प्राविण्य दाखवलय अशांना मात्र इथुन पुढेही अन्यायाचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारे बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणार्यांची संख्या कित्येक हजारांमध्ये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Beed: वक्फ बोर्डाची जमीन घोटाळ्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी, मंडल अधिकाऱ्यांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
- वक्फ बोर्ड जमीन घोटाळा; 35 हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केल्याचा आरोप
- Beed: बीड जिल्ह्यात आणखी एक इनामी जमीन घोटाळा, दिंद्रुड पोलीस स्टेशन मध्ये 10 जणांविरूद्ध गुन्हे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha