एक्स्प्लोर

Jammu Kashmir : बारामुल्ला आणि शोपियानमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांच्या 4 साथीदारांना अटक, AK47 रायफलसह दारूगोळा जप्त

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि शोपियान जिल्ह्यातून सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोएबाच्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे.

Jammu Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला आणि शोपियान जिल्ह्यातून सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोएबाच्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलीस प्रवक्त्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांसह पोलिसांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाशी संबंधित दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना बारामुल्ला येथून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दारूगोळ्यासह इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खचदारी जेहानपोराचा अज्ञात दहशतवादी गट बारामुल्लाच्या मुख्य भागात पोलीस आणि इतर सुरक्षा दलांविरुद्ध शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी अवैध शस्त्रे आणि दारूगोळा वापरत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती. 

मिळालेल्या माहितीवरून कारवाई करत, सुरक्षा दलांनी जेहानपोरा-खदनियार लिंक रोडसह अनेक ठिकाणी नाकेबंदी केली, असे प्रवक्त्यांनी सांगितली. प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, तपासादरम्यान जेहानपोराच्या बाजूने एका स्कूटीवर दोन लोक दिसले, जे संशयास्पद वाटत होते. नाकेबंदी पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सतर्क पोलिसांच्या पथकाने दोघांनाही पकडले. त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडून एके 47 रायफलच्या 40 राऊंड जप्त करण्यात आल्या.

इम्तियाज अहमद आणि मुनीर अहमद अशी त्यांची नावे असून ते खचदरी जेहानपोरा येथील रहिवासी आहेत, असे प्रवक्त्यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीदरम्यान, दोघांनी कबूल केले आहे की ते लष्कर-ए-तोएबा या बंदी घातलेल्या संघटनेसाठी काम करतात आणि दहशतवाद्यांसाठी बेकायदेशीर शस्त्रे आणि दारूगोळा वाहतूक करतात, ज्याचा वापर पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी केला जातो. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांना शोपियानमधून अटक केली आहे. एका प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलीस अधिकार्‍यांना दहशतवाद्यांचे दोन सहकारी आकिब मुश्ताक लोन आणि अमीर अमीन सोफी यांच्या सहभागाची माहिती मिळाली. दोघेही लष्करशी संबंधित असून ते शडचेक भागातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

iPhone 13 : गेहलोत सरकारकडून सर्व 200 आमदारांना iPhone 13 भेट, 'हे' आहे कारण?

E Challan : ट्रॅफिक नियम मोडल्याने ई-चलन निघालंय? घरबसल्या सहज ऑनलाईन भरा दंड

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget