Uma Maheshwari : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या मुलीची गळफास घेत आत्महत्या, नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
Telangana NT Rama Rao's Daughter Death: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची धाकटी मुलगी उमा माहेश्वरी यांनी सोमवारी आत्महत्या केली.
Telangana NT Rama Rao's Daughter Death: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची धाकटी मुलगी उमा माहेश्वरी यांनी सोमवारी आत्महत्या केली. हैदराबाद येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी सीआरपीसी कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
Telangana | TDP founder & ex-CM NT Rama Rao's daughter, Uma Maheshwari found hanging at her residence in Hyderabad. Police shifted the body to a local govt hospital for postmortem. A case is being registered U/s 174 CrPC (Police to enquire&report on suicide), further probe is on. pic.twitter.com/1WYIMo2ndd
— ANI (@ANI) August 1, 2022
उमा माहेश्वरी यांच्या निधनाने संपूर्ण एनटीआर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एनटीआरच्या कुटुंबातील इतर सदस्य उमा माहेश्वरी यांच्या घरी पोहोचले आहेत. चंद्राबाबू नायडूही लवकरच येणार असल्याची बातमी आहे. परदेशात उपस्थित असलेल्या ज्युनियर एनटीआर यांना उमा माहेश्वरी यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. सध्या त्यांचे पार्थिव दर्शनासाठी घरी ठेवण्यात आले आहे. यावेळी एनटीआरचे कुटुंबीय, नातेवाईक आणि अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. उमा माहेश्वरी यांच्या निधनाने अनेकजण शोक व्यक्त करत आहेत.