Jammu and Kashmir: चोवीस देशांचे राजदूत जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर, कलम 370 हटवल्यानंतर चौथा दौरा
जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर परदेशी राजदूतांचा हा चौथा दौरा आहे. या आधी ऑगस्ट 2019, जानेवारी 2020 आणि फेब्रुवारी 2020 साली परदेशी राजदूतांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली होती.
जम्मू: तब्बल 24 देशांचे राजदूत जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांच्या दौऱ्यावर आहेत. परदेशी राजदूतांचा हा चौथा दौरा आहे. या आधी ऑगस्ट 2019, जानेवारी 2020 आणि फेब्रुवारी 2020 साली परदेशी राजदूतांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली होती.
जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर परदेशी राजदूतांचा हा चौथा दौरा आहे. ते आता श्रीनगर आणि बडगाम या शहरात पोहचले आहेत. या राजदूतांमध्ये आफ्रिकन देश, पश्चिमी आशियाई देश आणि युरोपीय देशांच्या राजदूतांचा समावेश आहे. जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा असलेल्या कलम 370 आणि कलम 35A ला केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्ट 2019 साली रद्द केलं होतं.
Jammu and Kashmir: A batch of foreign envoys arrived in Srinagar today for a visit to the union territory.
Envoys from 24 nations are part of the delegation visiting the UT. pic.twitter.com/Z1if49qIXN — ANI (@ANI) February 17, 2021
परदेशी राजदूतांचे हे शिष्टमंडळ सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते, काही वृत्तपत्रांचे संपादक, प्रशासकीय अधिकारी आणि लष्कराच्या जवान व अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन जम्मू आणि काश्मीरमधील सद्य स्थितीचा आढावा घेणार आहेत.
Jammu and Kashmir: French envoy Emmanuel Lenain and Italian envoy Vincenzo de Luca interact with locals in Magam block of Budgam district.
A batch of foreign envoys is visiting the union territory. pic.twitter.com/9OZGsO7C0m — ANI (@ANI) February 17, 2021
तब्बल 18 महिन्यांनंतर संपूर्ण Jammu Kashmir मध्ये 4G इंटरनेटसेवा सुरु होणार
या आधी 9 जानेवारी रोजी अमेरिकन राजदूत आणि इतर 16 देशांच्या राजदूतांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली होती. 12 फेब्रुवारी रोजी एका 25 सदस्यीय राजदूतांच्या प्रतिमंडळाने जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला होता. त्यामध्ये जर्मनी, कॅनडा, फ्रान्स आणि अफगानिस्तान या देशांच्या राजदूतांचा समावेश होता.
जम्मू आणि काश्मीर या राज्याचा विशेष दर्जा रद्द करुन त्या राज्याचे जम्मू, काश्मीर आणि लडाख या तीन केंद्र शासित प्रदेशांमध्ये रुपांतर करण्यात आले होते.
माझा कट्टा | लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्याने वेगळी ओळख मिळाली : जामयांग नामग्याल