एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तब्बल 18 महिन्यांनंतर संपूर्ण Jammu Kashmir मध्ये 4G इंटरनेटसेवा सुरु होणार
इंटरनेट सेवा सुरु करण्याची माहिती समोर आल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत याबाबतचा आनंदही व्यक्त केला.
श्रीनगर : तणावाची परिस्थिती आणि काही घडामोडी पाहता संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेकदा इंटरनेट सेवांवर बंदी आणली जाते. पण, आता मात्र तब्बल 18 महिन्यांनंतर 4G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. अनुच्छेद 370 हटवल्यानंतरपासूनच या भागात 4G इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ज्यानंतर आता ही सेवा पुन्हा बहाल करण्यात आली आहे.
सदर भागात इंटरनेट सेवा सुरु करण्याची माहिती समोर आल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत याबाबतचा आनंदही व्यक्त केला. 4G मुबारक, असं लिहित त्यांनी एक ट्विट केलं.
Farmers Protest | शेतकरी आंदोलनाबाबत सचिनची भूमिका पाहून प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक म्हणतात, 'राग येतोच पण वाईट जास्त वाटतय' 2019च्या ऑगस्ट महिन्यानंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमघ्ये 4G मोबाईल डेटा वापरता येणार आहे. असं म्हणत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 5 ऑगस्ट 2019ला केंद्र सरकारनं जम्मू - काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या अनुच्छेद 370 रद्द करण्याचा निर्णय दिला. ज्यानंतर जम्मू काश्मीरची विभागणी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आली. जम्मू- काश्मीर आणि लडाख असे हे केंद्रशासित प्रदेश त्या क्षणापासून उदयास आले.4G Mubarak! For the first time since Aug 2019 all of J&K will have 4G mobile data. Better late than never.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 5, 2021
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement