एक्स्प्लोर

Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप, भाजपच्या महिला खासदारांकडून गैरवर्तनासंदर्भात तक्रारीचं पत्र

Rahul Gandhi Flying Kiss Controversy : राहुल गांधी यांनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. भाजपच्या महिला खासदारांकडून गैरवर्तनासंदर्भात तक्रारीचं पत्र स्पीकरकडे देण्यात आलं आहे.

Rahul Gandhi Flying Kiss Controversy : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचं पत्र दिलं आहे. राहुल गांधींनी संसदेत केलेल्या गैरवर्तनासंदर्भात भाजपच्या 22 खासदारांनी तक्रारीचं पत्र दिल्याची माहिती आहे.

राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप

संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरला. खासदारकी बहाल झाल्यानंतर आज राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत सहभागी झाले. मात्र आजच्याच दिवशी राहुल गांधी आरोपांच्या भोवऱ्यात अडकले. सभागृहातून जात असताना राहुल यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला आहे. लोकसभा सचिवालयाची सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेत असभ्य वर्तनाबाबत सर्वांशी बोलून नियमानुसार कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे.

स्मृती ईराणी यांचा नेमका आरोप काय?

राहुल गांधींच्या अडचणी वाढणार?

लोकसभेमध्ये कथितरित्या फ्लाईंग किस दिल्याप्रकरणी राहुल गांधांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. लोकसभा सचिवालयातील सूत्रांनी एबीपी नेटवर्कला ही माहिती दिली आहे. राहुल गांधींवर काय कारवाई केली पाहिजे, यावर सध्या विचार सुरू आहे. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं समजतंय.

''देशाच्या संसदेत यापूर्वी असं वर्तन पाहिलं नाही''

स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांच्या वर्तनावर तीव्र आक्षेप घेतला म्हटलं की, "माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्यांना माझ्या आधी बोलण्याची संधी देण्यात आली होती, त्यांनी जाण्यापूर्वी असभ्य वर्तन केलं. संसदेच्या महिला सदस्य असलेल्या संसदेला फ्लाइंग किस देऊ शकणारा हा केवळ दुष्ट पुरुष आहे. असं अशोभनीय वर्तन यापूर्वी कधीही देशाच्या संसदेत पाहिलं नव्हतं.''

महत्त्वाच्या इतर बातम्या :

सुफी संत रूमी यांच्या शब्दांनी सुरुवात... थेट अदानींवर निशाणा, अन् मग मणिपूरवरुन मोदी सरकारवर लक्ष्य; संसदेत काय म्हणाले राहुल गांधी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Embed widget