एक्स्प्लोर
पाच सहयोगी बँका स्टेट बँक ऑफ इंडियात विलीन होणार
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पाच बँकांच्या विलीनीकरणामुळे देशाची बँकिंग व्यवस्था बळकट होईल. तसंच बँकिंग क्षेत्राची कार्यक्षमता आणि फायदा, दोन्हींमध्ये वाढ होईल, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.
स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ जयपूर अँड बिकानेर या सर्व सहयोगी बँकांचं स्टेट बँक ऑफ इंडियात विलीनीकरण होणार आहे.
मात्र भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया आकाराच्या दृष्टीने जागतिक स्तरावरची एक मोठी बँक बनली आहे. सहयोगी बँकांतील सर्व ग्राहकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एसबीआयच्या सर्व सुविधांचा फायदा मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement