एक्स्प्लोर
पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त देशभरातील शिवमंदिरात भविकांची गर्दी
श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार असल्यामुळे देशभरासह राज्यातही मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. देशातल्या प्रत्येक शिव मंदिरात 'हर हर महादेव'चा जयघोष करत भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.
मुंबई : श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार असल्यामुळे देशभरासह राज्यातही मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. देशातल्या प्रत्येक शिव मंदिरात 'हर हर महादेव'चा जयघोष करत भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.
त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी
श्रावण सोमवारनिमित्त आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भर पावसात भाविकांची गर्दी दिसत आहे. 'हर हर महादेव', बम बम भोलेच्या जयघोषाने त्र्यंबकनगरी दुमदुमली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळातर्फेही जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
घृष्णेश्वराला दुग्धाभिषेक
औरंगाबादमधील 12 जोतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात भविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या आहेत. बेल-फुलांनी शिवलिंग सजलं आहे. तर काही भविक महादेवाला दुग्धाभिषेक ही करत आहेत.
भीमाशंकरच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्याजवळील भीमाशंकर हे एक सह्याद्रीच्या खुशीत असलेले महादेवाचे जागरूक स्थान आहे. आज पहिला सोमवार म्हणून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
अंबरनाथमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत दर्शन व्यवस्था
अंबरनाथचं मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाय हे मंदिर दहशतवाद्यांच्याही हिटलिस्टवर असल्यानं इथं नेहमीच कडक सुरक्षाव्यवस्था असते. श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीला इथं मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. या भाविकांसाठी स्थानिकांच्या वतीनं व्यवस्था केली जाते. सोबतच पोलिसांचाही इथं कडक पहारा असतो. आज श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement