एक्स्प्लोर

सलमान खुर्शीद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; हिंदुत्वाची तुलना आयसीससोबत केल्यानं उत्तर प्रदेश न्यायालयाचा आदेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हराम या दहशतवादी गटांशी केली होती. 

लखनौ : उत्तर प्रदेशातील एका न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना ही आयसीस आणि बोको हराम यासारख्या दहशतवादी गटांसोबत केली होती. 

लखनौच्या एका न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना हा आदेश देण्यात आला आहे. शुभांगी तिवारी यांनी सलमान खुर्शीद यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झालाय. ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या खुर्शीदांच्या नव्या पुस्तकातील हिंदुत्वाच्या तुलनेमुळे खुर्शीद वादात सापडलेत. खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे.

हिंदुत्वाबद्दल नेमकं काय लिहिलंय? 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकाचं प्रकाशन बुधवारी झालं. त्यावरुन आता देशात मोठा वाद सुरु झालाय. या पुस्तकात हिंदूत्वाबद्दल असं लिहिण्यात आलं आहे की, 'ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे.'

खुर्शीद यांच्या 300 पानांच्या पुस्तकांमध्ये हिंदू धर्माविषयी हा उल्लेख आला असल्याने आता हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप आक्रमक झालं आहेत. हिंदुत्वाचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपनं खुर्शीदांविरोधात तक्रार केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
Embed widget