'संभालो मुझको ओ मेरे यारो!' फारुख अब्दुल्ला आणि अमरिंदर सिंह यांचं शानदार नृत्य, व्हिडीओ व्हायरल
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांच्या नातीच्या लग्नात फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे या गाण्यावर नृत्याचा ठेका धरला. त्याचा एक व्हिडीओ आता सोशम मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
चंदिगड : अनेकजण म्हणतात की वय हे फक्त एक नंबर असतं, माणूस मनानं तरुण असेल तर कोणत्याही वयात तो जीवनाचा आनंद घेऊ शकतो. असाच काहीसा अनुभव हा जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिला आहे. हे दोघेही बॉलिवूडच्या जुन्या गाण्यावर थिरकताना दिसताहेत. या संबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
निमित्त होतं कॅप्टन अमरिंदर सिंह यांची नात सेहरिंदर कौर यांच्या विवाहाचं. चंदिगडमध्ये झालेल्या या विवाह सोहळ्याला जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी हिंदी गाण्यांवर थिरकायला सुरुवात केली. आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबॉं पर या गाण्यावर नाचत असताना त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनाही नाचायला लावलं. त्यानंतर गुलाबी ऑंखे जो तेरी देखी या गाण्यावर त्यांनी नृत्य करायला सुरुवात केली. यावेळी आवेशात आलेल्या फारुख अब्दुल्ला यांनी गायलाही सुरुवात केली.
This video of @capt_amarinder & Farooq Abdullah proves that age is, indeed, just a number! @OmarAbdullahpic.twitter.com/j48MgTYVoD
— Saral Patel (@SaralPatel) March 4, 2021
या दोघांच्या या डान्सचा व्हिडीयो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. बॉलिवूडच्या गाणी वयाने तरुण असलेल्यांना थिरकवतातच पण त्यासाठी केवळ वयाचं बंधन नसतं हे अनेकवेळा स्पष्ट झालंय. आताही 'संभालो मुझको ओ मेरे यारो' असं म्हणत शानदार नृत्य केलेल्या फारुख अब्दुल्ला आणि कॅप्टन अमरिंदर सिंहांनीही आता गाण्यावर थिरकताना वयाचं कोणतंही बंधन नसतं हे सिध्द केलंय.
संबंधित बातम्या: