Farmers Protest : शेतकरी-केंद्र सरकारमध्ये आज होणार बैठक, सात दिवसांतील तिसरी बैठक, मागण्या मान्य न झाल्यास घेणार आक्रमक पवित्रा
Farmers Protest 2.0 : आंदोलन संपवण्यासाठी आज पुन्हा 3 केंद्रीय मंत्री चंदीगडमध्ये शेतकरी नेत्यांची बैठक घेणार आहेत. उभय पक्षांमधील सात दिवसांतील ही तिसरी बैठक असेल.
Farmers Protest 2.0 : दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचा (Farmers Protest) आज तिसरा दिवस आहे. मंगळवारी शंभू सीमेवर झालेल्या गोंधळानंतर आजही तणावाची स्थिती कायम आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी आज सायंकाळी पाच वाजता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचं ठरलंय. तोपर्यंत पुढे न जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
सात दिवसांतील ही तिसरी बैठक
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबच्या खानौरी आणि डबवली सीमाही तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, आंदोलन संपवण्यासाठी आज पुन्हा 3 केंद्रीय मंत्री चंदीगडमध्ये शेतकरी नेत्यांची बैठक घेणार आहेत. उभय पक्षांमधील सात दिवसांतील ही तिसरी बैठक असेल. तिन्ही मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सरवनसिंह पंढेर यांनी सांगितले. या मागण्या आहेत, एमएसपीची कायदेशीर हमी, कर्जमाफी आणि वीज कायदा रद्द करा. पंढेर यांनी राज्याच्या सीमेवर निमलष्करी दलाची तैनाती, पोलिसांची कारवाई आणि ड्रोनचा वापर यावरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, शेतकरी शांततेने आंदोलन करत असतील तर बळाचा वापर का केला जात आहे.
हरियाणा-राजस्थान सीमेवरही कडक सुरक्षा व्यवस्था
रेवाडीतील दिल्ली-जयपूर महामार्गावर असलेल्या जयसिंगपूर खेडा सीमेवर सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांच्या (हरियाणा-राजस्थान) पोलिस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त येथे आरएएफ तैनात करण्यात आले आहे. याशिवाय डंपर, मोठे बॅरिकेड्स, जड दगडफेकही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचे फोन होतायत ट्रॅक? शेतकरी नेत्याचा दावा
किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस पंढेर यांनी शेतकऱ्यांना लक्ष्य करण्यात आले असून त्यांचा फोन ट्रॅक केला जात असल्याचा दावा केला आहे. पंढेर म्हणाले की, त्यांना मंगळवारी रात्री चर्चेसाठी संदेश मिळाला. यानंतर आम्ही चर्चा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पंढेर यांनी केंद्र सरकार शंभू सीमेवर शेतकऱ्यांवर अश्रुधुराचे गोळीबार करत असल्याची टीका केली. पंढेर म्हणाले की, केंद्राने शेतकऱ्यांना मुद्दाम चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आणि जाणीवपूर्वक बळाचा वापर केल्याचा आरोपही केला.
टोल प्लाझा फ्री करण्याची घोषणा
संयुक्त किसान मोर्चा (SKM)पंजाबमधील सर्व टोलनाके आज दुपारी 11 ते 2 या वेळेत 3 तासांसाठी मोफत करणार आहे.
भारतीय किसान युनियन (उग्रहण) ने आज पंजाबमधील 6 जिल्ह्यांमध्ये दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत गाड्या थांबवण्याची घोषणा केली आहे.
हरियाणातील भारतीय किसान युनियनचे (चाधुनी ग्रुप) प्रमुख गुरनाम चादुनी यांनीही आज सकाळी 11 वाजता त्यांच्या समर्थकांची तातडीची बैठक बोलावली आहे.
हेही वाचा >>>
Farmer Protest : शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी सरकार कायदा का करत नाही ? नेमकी अडचण तरी काय?