(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmers Protest | शेतकरी आंदोलनाचा आज 122 वा दिवस, दिल्लीच्या सीमेवर आज होणार होलिका दहन
Farmers Protest : दिल्लीच्या सीमेवर आज शेतकरी होळीच्या निमित्ताने होलिका दहन करणार असून त्यात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याची कॉपी पेटवण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधातले आंदोलन काही संपण्याची चिन्हे नाहीत. आज शेतकरी आंदोलनाचा 122 वा दिवस असून त्यानिमित्ताने दिल्लीच्या सीमेवर होलिका दहन करण्यात येणार आहे. या होलिका दहनाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या कॉपी जाळण्यात येणार आहेत.
शुक्रवारी शेतकरी आंदोलकांच्या वतीने भारत बंदचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याला काहीसा अल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय. सुरुवातीला या आंदोलनाला जेवढा प्रतिसाद मिळाला होता तेवढा प्रतिसाद या भारत बंदला मिळाला नाही. तरीही हे केंद्र सरकारने हे कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलंय. आज टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांनी होलिका दहनाचा कार्यक्रम ठेवला असून त्यामध्ये केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या प्रती जाळण्यात येणार आहेत.
भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकेत यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या प्रती जाळण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यातून केंद्र सरकारला एक प्रतिकात्मक संदेश देण्यात येणार आहे.
या वर्षी शेतकरी आंदोलकांनी होळी न खेळण्याचा निर्णय घेतलाय. त्या ऐवजी त्यांनी एकमेकांनी मातीचा टिळा लावण्याचा निर्णय घेतलाय. तसेच या आंदोलनावेळी ज्यांनी आपला प्राण गमावला त्यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे.
गेल्या चार महिन्यापासून शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरु आहे. या दरम्यान, शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या पण अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शनिवारी सांगितलं की, शेतकरी नेते ज्यावेळी ठरवतील त्यावेळी हे आंदोलन संपेल.
महत्वाच्या बातम्या ;
- Covovax | सीरम इन्स्टिट्यूट आणि Novavax यांच्या Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात
- PM modi Bangladesh tour | पंतप्रधान मोदीच्या हस्ते 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या जेशोरेश्वरी काली देवीच पूजा
- तामिळनाडूत निवडणूक प्रचारासाठी गेलेल्या स्मृती इराणी यांचं पारंपरिक संगितावर नृत्य, व्हिडीओ व्हायरल