(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmer Protest | 26 मार्चला भारत बंदची घोषणा, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
भारत बंदची वेळ आणि स्वरूप आदी मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वाहतूक संघटनांशी 17 मार्चला बैठक होणार आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला आता शंभरहून अधिक दिवस पूर्ण झालेत. राजधानी दिल्लीला अजूनही चार सीमांवर शेतकऱ्यांचा वेढा कायमच आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोल करणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 मार्चला भारत बंदची हाक दिली आहे. आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्यावर शेतकरी संघटना चक्का जाम करण्यात येणार आहे. दरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पक्की घरे बांधण्यास सुरूवात केली आहे.
बुधवारी सिंघु सीमेवर संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. या बैठकीच 26 मार्चला भारत बंदची घोषणा करण्यात आली. भारत बंदची वेळ आणि स्वरूप आदी मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वाहतूक संघटनांशी 17 मार्चला बैठक होणार आहे. वाढत्या पेट्रोल- डिझेलच्या किमती, गॅसचे दर आणि खाजगीकरणाच्या विरोधात शेतकरी 15 मार्चला कामगार संघटनेसोबत रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करण्यात असल्याचे देखील किसान मोर्चाने सांगितले आहे. तसेच 28 मार्चला कृषी कायद्याच्या प्रती जाळण्यात येणार आहे.
पक्की घरे बांधण्यास सुरुवात
दरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंघु सीमेवर पक्के घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. घरे बांधण्यासाठी वीटांपासून ते बांधकाम कामगार पंजाबबून बोलवण्यात आले आहे. संयुक्त किसान मोर्चाचे दीप खत्री म्हणाले, दोन मजली घरे देखील बांधण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात झाली होती तेव्हा दिवस नोव्हेंबरचे होते. दिल्लीत कडाक्याची थंडी होती. थंडीचे दिवस कसे तरी शेतकऱ्यांनी प्लास्टिकच्या तंबूमध्ये घालवले. परंतु आता थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल सुरु झालीय. त्यामुळे मार्च महिन्यातील उन्हामुळे शेतकऱ्यांना त्रास होईल. त्यामुळे सिंघु सीमेवर पक्के घरे बांधण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार तोपर्यंत शेतकरी आंदोलन मागे घेणार आहे.
एकीकडे आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण होत असतानाच आता बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांच्या निवडणुकांचंही बिगुल वाजलंय. आंदोलनानंही त्यानुसार आपली दिशा बदलायचं ठरवलंय. शिवाय ज्या राज्यांत निवडणुका होतायत तिथे जाऊन भाजपला मतदान करु नका असंही आवाहन शेतकरी नेते करणार आहेत.
आंदोलनात आत्तापर्यंत दोनशेच्या आसपास शेतकऱ्यांचा बळी गेलाय. देशाचा अन्नदाता इतक्या प्रदीर्घ काळासाठी रस्त्यावरची लढाई लढतोय. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी एक आंदोलन अशी ओळख बनलेले हे आंदोलन आता भविष्यात कुठल्या दिशेनं जातं आणि त्यातून आंदोलकांच्या पदरी काय पडतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
Farmer Protest : आता महिला शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणार, योगेंद्र यादवांची माहिती
Farmers Protest | देशातल्या एकूण खासदारांपैकी निम्मे आहेत शेतकरी, तर मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शाहांसह एक तृतीयांश मंत्रीही शेतकरीच
Farmer Protest : 100 दिवस... थंडी, पाऊस, नाकेबंदी, लाठीमार, हिंसा! तरीही शेतकरी मागे हटले नाहीत