Shyam Rangeela : मोदींच्या मिमिक्रीने प्रकाशझोतात, आता थेट 'आप'मध्ये प्रवेश, कॉमेडियन श्याम रंगीलाच्या हाती 'झाडू'!
Shyam Rangeela : आम आदमी पार्टी (आप) मध्ये सामील झाल्यानंतर श्याम रंगीला म्हणाले की, राजस्थानलाही 'कामाचे राजकारण' हवे आहे.
Shyam Rangeela : आपल्या विनोदाने तसेच मिमिक्रीने अनेकांना हसवणारा कॉमेडियन श्याम रंगीला (Shyam Rangeela) याने गुरुवारी आम आदमी पार्टी (AAP) मध्ये प्रवेश केला आहे. 'आप'चे राजस्थान निवडणूक प्रभारी विनय मिश्रा यांनी श्याम रंगीला याला जयपूरमध्ये पक्षात सामील करून घेतले आहे. यावर आम आदमी पार्टीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याचे स्वागत करण्यात आले. तसेच, "श्याम रंगीला आपल्या कॉमेडीने लोकांच्या दुःखी चेहऱ्यावर हसू आणत आहेत. आता तो कलेबरोबरच देशहिताचे काम करणार. आता तो आम आदमी पक्षाच्या साथीने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात देशहिताचे काम करणार आहे."
Rajasthan के मशहूर हास्य कलाकार @ShyamRangeela AAP में शामिल!
— AAP (@AamAadmiParty) May 5, 2022
श्याम रंगीला जी लोगों के उदास चेहरों पर अपने व्यंग्य से मुस्कुराहट लाते रहे हैं।
अब वो कला के साथ-साथ देश में 'काम की राजनीति' करने वाली आम आदमी पार्टी के साथ मिलकर शिक्षा और स्वास्थ्य क्रांति की अलख जगाएंगे। pic.twitter.com/4LnGIqPe00
दुसरीकडे, श्याम रंगीला याने ट्विट करून म्हटले आहे की, "राजस्थानलाही जनतेच्या हिताचे काम करणाऱ्या व्यक्तीची गरज होती. आणि मी यामध्ये आम आदमी पार्टीच्या बरोबर लोकहिताचे काम करण्यासाठी सज्ज आहे". असं म्हटलं आहे.
राजस्थान को भी ‘काम की राजनीति’ की आवश्यकता है, और हम ‘काम की राजनीति’ और ‘आप’ के साथ है 🙏🏽 🙂
— Shyam Rangeela (@ShyamRangeela) May 5, 2022
धन्यवाद https://t.co/oYW9Wj8wjJ
दोन दिवसांपूर्वी दिल्लीत श्याम रंगीला याने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यांनी दिल्ली सरकारी शाळा आणि मोहल्ला क्लिनिकला भेट दिली आणि तेथील व्यवस्थेचे कौतुक केले.
श्याम रंगीला म्हणाला, “मोहल्ला क्लिनिकची संकल्पना अतिशय प्रभावी होती. सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या समस्यांवर प्राथमिक उपचार येथून केले जातात. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही भेट दिली. तेथील लोकांचा प्रतिसादही सकारात्मक पाहायला मिळाला."
महत्वाच्या बातम्या :
- OBC Reservation : महाराष्ट्राचे डोळे मध्यप्रदेशकडे, सु्प्रीम कोर्टात मंगळवारी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वात मोठा फैसला
- Mission Rail Karmayogi : कोणती ट्रेन कुठे येणार? कोच कुठे असणार? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार ‘रेल्वे कर्मयोगी’! जाणून घ्या नव्या मोहिमेबद्दल...
- 'युद्धाने कोणताही देश जिंकत नाही', रशिया-युक्रेन युद्धाबाबत पंतप्रधान मोदी यांचा वक्तव्य