![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Survey : सर्व्हेमध्ये भाग घ्या, तुमचं मत नोंदवा, तुम्ही किती वेळा ऑनलाईन बातम्या बघता? सोशल मीडिया किती वापरता?
Digital News Publishers Association : मीडिया उद्योगातील बहुआयामी भूमिकांपैकी या क्षेत्रासाठी समर्थन करणे, सर्वोत्तम पद्धतींचा प्रचार करणे, सहकार्य वाढवणे, संशोधन, शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेस स्वातंत्र्यावर भर देणे हा यामागचा उद्देश आहे.
![Survey : सर्व्हेमध्ये भाग घ्या, तुमचं मत नोंदवा, तुम्ही किती वेळा ऑनलाईन बातम्या बघता? सोशल मीडिया किती वापरता? evolution of news consumption patterns take dnpa survey to enhance digital news serving marathi news Survey : सर्व्हेमध्ये भाग घ्या, तुमचं मत नोंदवा, तुम्ही किती वेळा ऑनलाईन बातम्या बघता? सोशल मीडिया किती वापरता?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/12/987841e73d52cfbce3e5ce925db5d73f1705058583045358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Digital News Publishers Association : गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानातील प्रगती आणि प्रेक्षकांच्या आवडीमध्ये झालेल्या बदलांमुळे बातम्यांच्या वापराच्या लँडस्केपमध्ये फार मोठं परिवर्तन झालं आहे. या सर्वांमध्ये शॉर्ट व्हिडीओच्या माध्यमातून बातम्या सांगण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. या बदलांमुळे केवळ बातमी पाहणाऱ्या ग्राहकांच्या आवडीनिवडीच बदलल्या नाहीत. तर, डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन (DNPA) ला वाचकांच्या विकसित गरजा चांगल्या प्रकारे ओळखता याव्यात यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आलंय.
Take The Survey : Click Here...
बातम्यांच्या स्वरूपातील बदलते ट्रेंड :
पारंपारिक पद्धतीचा विचार केल्यास, बातम्यांचा वापर प्रामुख्याने मजकूर आधारित होता. वाचक चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी वर्तमानपत्र किंवा मासिकांवर अवलंबून असतं. मात्र, कालांतराने इंटरनेटचं जाळं पसरत गेलं. आणि इंटरनेट तसेच स्मार्टफोनच्या वाढत्या प्रसारामुळे बातम्या कशा वापरल्या जातात यात लक्षणीय बदल झाला आहे. आज, वाचक अशी माहिती शोधतात जी केवळ माहितीपूर्णच नाही तर सहज कळणारी देखील आहे. ज्यामुळे शॉर्ट व्हिडीओ हे लोकांच्या पसंतीचं माध्यम ठरलं आहे.
बातम्या पाहण्याच्या सवयींवर परिणाम :
लहान व्हिडीओ कंटेटच्या वाढीमुळे केवळ बातम्या सादर करण्याच्या पद्धतीच बदलल्या नाहीत तर बातम्या पाहणाऱ्यांच्या ग्राहकांच्या सवयींवरही परिणाम झाला आहे. वाचक आता बातम्या बाईट साईझ फॉर्मेटमध्ये पाहणं पसंत करतात. या बदलामुळे बातम्यांचे प्राथमिक स्त्रोत म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहणं देखील वाढले आहे. कारण ते आपल्या मोबाईलमध्ये लहान व्हिडीओ सेव्ह करू शकतात.
Take The Survey : Click Here...
DNPA ची कामगिरी
बातम्यांच्या वापराचे विकसित होणारे लँडस्केप ओळखून, डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनने वापरकर्त्यांकडून माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण करून एक सक्रिय दृष्टीकोन घेतला आहे. प्रेक्षकांकडून थेट इनपुट मिळवून, आकर्षक राहील याची खात्री करून, वापरकर्त्यांच्या प्राधान्यांनुसार बातम्या कव्हरेज तयार करण्याचे DNPA चे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम डिजिटल न्यूज इकोसिस्टमच्या बदलत्या गतीशीलतेशी जुळवून घेणारा आहे.
डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन (DNPA) बातम्या प्रसारासाठी एक प्रमुख मार्गदर्शक आहे. डिजिटल वृत्त प्रकाशकांच्या वाढत्या नेटवर्कसह, DNPA, 17 भारतीय माध्यम संस्थांचा समूह, उद्योगाच्या हितसंबंधांना पुढे नेण्यात आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात सहकार्याला चालना देण्यात मोठी भूमिका बजावते.
मीडिया उद्योगातील त्याच्या बहुआयामी भूमिकांपैकी या क्षेत्रासाठी समर्थन करणे, सर्वोत्तम पद्धतींचा प्रचार करणे, सहकार्य वाढवणे, संशोधन, शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेस स्वातंत्र्यावर भर देणे हा यामागचा उद्देश आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)