एक्स्प्लोर

New EVM Machine  : भारतात येणार नवीन ईव्हीएम मशीन, देशातील कोणत्याही भागातून करता येणार मतदान 

New EVM Machine : निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 10,000 नव्या डायनॅमिक ईव्हीएम मशीन आणल्या जाऊ शकतात.

New EVM Machine : भारतात लवकरच नवीन प्रकारच्या ईव्हीएम मशीन येणार आहेत. या नवीन मशीन्स रिमोट व्होटिंग मशीन म्हणून ओळखल्या जातील. सध्या मतदानासाठी वापरल्या जाणार्‍या ईव्हीएम मशिन्सपेक्षा ही नवीन मशिन्स आधुनिक असणार आहेत. या नव्या मशीनयाद्वारे मतदाराला देशात कुठेही बसून आपल्या मतदारसंघातील मतदान करता येणार आहे. 

ज्या नवीन ईव्हीएम मशिन येणार आहेत त्याच्या बॅलेट युनिटमध्ये फक्त ज्या भागात ही मशीन वापरली जाणार आहे त्या भागातील उमेदवारांच्या नावांची यादी असणार आहे. परंतु, नव्या डायनॅमिक ईव्हीएममध्ये डेटा गोळा करण्याची क्षमता जास्त असेल. नवीन ईव्हीएममध्ये इतका डेटा जतन केला जाऊ शकतो की दिल्लीत बसलेला कोणताही मतदार उत्तर प्रदेशातील आझमगड, कर्नाटकातील बंगळुरू किंवा काश्मीरमधील श्रीनगरमधील लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघ शोधून त्याच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू शकतो. .

New EVM Machine :  10 हजार ईव्हीएम मशीन येऊ शकतात

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार,  10,000 नव्या डायनॅमिक ईव्हीएम मशीन आणल्या जाऊ शकतात. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील दुर्गम आणि शहरी भागात अशा 5-6 मशीन्स तैनात करण्यात येतील. शिवाय मोठ्या शहरांमध्ये देखील त्यांची संख्या प्रमाणानुसार वाढवली जाईल. परंतु, मोठ्या शहरांमध्ये नवीन ईव्हीएमची संख्या वाढवावी लागेल कारण तेथे स्थलांतरित मतदारांची संख्या खूप जास्त आहे. 

निवडणूक आयोगा या नव्या मशीन लवकरात लवकर आणण्यासाटी प्रयत्नशील आआहे. निवडणूक आयोगाच्या नियोजन यशस्वी झाले तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी या नव्या मशीन येतील. या नव्या मशीनयाद्वारे मतदाराला देशात कुठेही बसून आपल्या मतदारसंघातील मतदान करता येणार आहे. 

रिमोट व्होटिंग मशीन म्हणजे काय?

रिमोट व्होटिंग मशीन अर्थात आरव्हीएमबाबत गेल्या वर्षी 29 डिसेंबर रोजी माहिती समोर आली होती. यावर स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगाने म्हटले होते की, RVM च्या माध्यमातून स्थलांतरित नागरिक म्हणजेच त्यांच्या मूळ राज्याबाहेर राहणारे मतदार देखील आपल्या भागातील नेत्याला मतदान करू शकतात. उदाहरणार्थ, मतदार पुण्याता जन्माला आला असेल आणि काही कारणास्तव तो दुसऱ्या राज्यात किंवा इतर ठिकाणी राहत असेल तर तो मतदार मतदान करू शकत नाही. परंतु, आरव्हीएमच्या मदतीने अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.  EVM प्रमाणे RVM ला कोणत्याही प्रकारचे इंटरनेट किंवा कनेक्टिव्हिटी आवश्यक नसते. 

16 जानेवारी रोजी झाले प्रात्यक्षिक 

निवडणूक आयोगाने 16 जानेवारी रोजी देशातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांसमोर रिमोट व्होटिंग मशीनचे (RVM) प्रात्यक्षिक दाखवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग रिमोट मतदान यंत्रांबाबत राजकीय पक्षांशी चर्चा करणार आहे. यासोबतच त्यांनी 31 जानेवारी 2023 पर्यंत आरव्हीएमशी संबंधित मुद्द्यांवर लिखित स्वरुपात आपले म्हणणे मांडण्याची मागणी केली होती. मात्र, अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमप्रमाणेच आरव्हीएमवरही प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget