(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aatmanirbhar Bharat : 10 महिन्यात 30 लाखांपेक्षा जास्त रोजगार, आत्मनिर्भर भारत योजनेचं मोठं यश
Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana : कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेवेळी केंद्र सरकारने सुरु केलेल्या महत्वकांक्षी आत्मनिर्भर भारत योजनाचा (ABRY) लाभ आता दिसू लागलाय.
Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana : कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेवेळी केंद्र सरकारने सुरु केलेल्या महत्वकांक्षी आत्मनिर्भर भारत योजनाचा (ABRY) लाभ आता दिसू लागलाय. रोजगाराच्या दृष्टीने मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेला सुरुवात केली होती. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत मागील दहा महिन्यात जवळपास तीस लाख 29 हजार जणांना रोजगार दिला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO)वतीने जारी केलेल्या आकडेवारी ही माहिती समोर आली आहे. नोहेंबर 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत योजनेला सुरुवात झाली होती. इकॉनॉमिक टाइम्समध्ये आलेल्या वृत्तानुसार, आत्मनिर्भर भारत योजनेची सुरुवात झाल्यानंतर वर्षभरात जवळपास 3.29 मिलियन लोकांसाठी रोजगार निर्मिती झाली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेच्या अखेरपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2022 पर्यंत केंद्र सरकारने 5.85 मिलियन रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवलं आहे. म्हणजेच पुढील सहा महिन्यात 2.56 मिलियन रोजगाराची निर्मिती करणं गरजेचं आहे.
एकूण रोजगारापैकी 2.88 मिलियन नवीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 0.41 मिलियन पुन्हा लाभार्थी आहेत. सप्टेंबर 2021 पर्यंत आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत खर्च करण्यात आलेली रक्कम 1,845 कोटी रुपये आहे. जी 31 मार्च 2024 पर्यंत ठरवलेल्या 22,810 कोटी रुपयांपैकी फक्त 8 टक्के इतकी आहे. मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची सुरुवात नोव्हेंबर 2020 मध्ये झाली. एक ऑक्टोबर 2020 ते 30 जून 2021 या कालावधीसाठी ही योजना सुरु केली होती. पण कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे या योजनेचा कालावधी 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आला.
आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत दोन वर्षांपर्यंत सरकार अनुदान देईल. ज्या संस्थेत 1000 पर्यंत कर्मचारी आहेत त्यामध्ये 12 टक्के कर्मचाऱ्याच्या वतीने आणि 12 टक्के कंपनीच्या वतीने केंद्र सरकार देईल. एक हजारहून अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये कर्मचाऱ्याचा 12 टक्के भाग केंद्र देईल. 65 टक्के संस्थांचा यामध्ये समावेश असेल. करोनातून सावरल्यानंतर रोजगाराच्या संधी वाढवणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. यासाठी सरकार आणि बॅंकांनी गुंतवणूक केली आहे. ही रक्कम देशाच्या जीडीपीच्या 13 टक्के आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha