एक्स्प्लोर

Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापीमधील सर्वेक्षणावर 26 जुलैपर्यंत स्थगिती; सुप्रीम कोर्टाचे आदेश

Gyanvapi Mosque Case: सर्वेक्षणासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचं पथक सोमवारी ज्ञानवापी मशिदीत पोहोचलं होतं, पण आता सुप्रीम कोर्टाने सर्व्हेला 26 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे.

Gyanvapi Mosque Case: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने 26 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. यासोबतच परिसरात दोन आठवडे कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये, असं देखील सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्थापनावर (Gyanvapi Masjid Case) देखरेख करणाऱ्या अंजुमन समितीने (Anjuman Committee) सर्व्हेविरोधात याचिका दाखल केली होती. काशी विश्वनाथ मंदिराशेजारील मशीद परिसराचं सर्वेक्षण करण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

सोमवारी (24 जुलै) वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार एएसआयचं पथक सर्वेक्षणासाठी मशिदीच्या परिसरात पोहोचलं होतं. सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी सर्वेक्षण पथकाला सकाळी 11.15 वाजता कोर्टात हजर राहून सर्वेक्षणाची माहिती देण्यास सांगितली होती. याच दरम्यान, सुप्रीम कोर्टाने ज्ञानवापी मशिदीतील सर्व्हेला 26 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे.

आम्हाला अपील करण्याची संधी मिळाली नाही - अंजुमन समिती

अंजुमन समितीतर्फे वरिष्ठ वकील हुजैफा अहमदी खंडपीठात बाजू मांडत आहेत. शुक्रवारी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असून, आम्हाला अपील करण्याची संधी मिळाली नाही आणि त्याआधीच सर्वेक्षण सुरू झाल्याचं अंजुमन समितीकडून सांगण्यात आलं. खोदकामासंदर्भातील आदेश असल्यास आम्हाला दाद मागण्याची संधी मिळावी, असं अहमदी म्हणाले होते.

सर्वेक्षणादरम्यान खोदकाम होणार का? - कोर्ट

सर्वेक्षणादरम्यान खोदकाम होणार आहे का? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला असता, यूपी सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सांगितलं की सर्वेक्षण हे आधुनिक तंत्रज्ञानाने केलं जाईल. यामध्ये कोणतंही नुकसान होणार नाही. हिंदू पक्षातर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनीही सर्वेक्षणात कोणतंही खोदकाम होणार नसल्याचं सांगितलं होतं.

पश्चिमेकडील भिंतीवर खोदकाम - हुजैफा अहमदी

अंजुमन समितीचे वकील अहमदी यांनी खंडपीठाला सांगितलं की, आम्ही सर्वेक्षणासाठी दोन-तीन वेळा स्थगिती देण्याची विनंती केली होती, मात्र तरीही सर्वेक्षणाला स्थगिती देण्यात आली नव्हती. वैज्ञानिक सर्वेक्षणाची वेळ अद्याप आलेली नाही, असं आम्ही मानतो आणि पहिलं हे प्रकरण गुणवत्तेवर पाहिलं पाहिजे, असं अहमदी म्हणाले. तर, पश्चिमेकडील भिंतीवर खोदकाम केलं जात असल्याचंही ते म्हणाले.

एक वीटही हलली नाही - तुषार मेहता

उत्तर प्रदेश सरकारचे वकील तुषार मेहता यांनी मशिद परिसरातील एकही वीट हलवण्यात आली नसल्याचं सांगितलं. आठवडाभर सर्वेक्षणादरम्यान कोणतीही हानी होणार नसल्याचं वकील मेहता म्हणाले होते. मात्र तरीही अहमदी यांनी सर्वेक्षण थांबवण्याची आग्रही मागणी केली आणि सर्वेक्षण दोन दिवस थांबवण्यात आले.

हेही वाचा:

Manipur Violence: मणिपूर पोलिसांना पुराव्यांसह मिळाला 'तो' मोबाईल; ज्यात रेकॉर्ड करण्यात आला विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं

व्हिडीओ

NCP Merger : विलिनीकरणाचा हुकलेला मुहूर्त, अजितदादांच्या नेत्यांकडून सावध भूमिका Special Report
Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात
Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report
Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget