एक्स्प्लोर

Mamata on Nandigram Results: नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणीची मागणी करत ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'कोर्टात जाणार'

Mamata on Nandigram Results: शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. मात्र निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

कोलकाता : देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. मात्र आधी ममता बॅनर्जी यांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. यासंदर्भात एएनआयनं ट्वीट केलं आहे. दरम्यान नंदीग्रामध्ये फेर मतमोजणीची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की, नंदीग्रामबद्दल काळजी करू नका, मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला आहे. कारण माझ्यासाठी ही निवडणूक एक आंदोलन होती. नंदीग्राममधील लोकांनी जो कौल दिला तो मी स्वीकारते. आम्ही 221 हून अधिक जागा जिंकल्या आणि भाजप निवडणूक हरला आहे, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. 

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जीच्या पराभवावर शरद पवार म्हणाले, हा 'रडीचा डाव!'

याबाबत शरद पवारांनी देखील ट्वीट केलं असून त्यांनी म्हटलं आहे की, बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!, असं पवारांनी म्हटलं आहे. 

ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की, नंदीग्रामबद्दल काळजी करू नका, मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला आहे. कारण माझ्यासाठी ही निवडणूक एक आंदोलन होती. नंदीग्राममधील लोकांनी जो कौल दिला तो मी स्वीकारते. आम्ही 221 हून अधिक जागा जिंकल्या आणि भाजप निवडणूक हरला आहे, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. 

ममता यांच्या पराभवानंतर तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी देखील ट्वीट केलं आहे. काही मोठ्या लढाया जिंकण्यासाठी बलिदान तर द्यावंच लागतं, असं त्यांनी म्हटलंय.

दुसरीकडे तृणमूलनं ट्वीट करत म्हटलं आहे की, नंदीग्राम विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. कृपया अंदाज काढू नका.

ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव झाला असला तरी पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या कलावरून सध्या तृणमूल काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असंच दिसतंय. नंदीग्राममध्ये सुरुवातीपासूनच अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. सुरुवातीला भाजपच्या शुभेन्दु अधिकारी यांनी ममतांना पिछाडीवर टाकत मोठी आघाडी घेतली होती. नंतर काही वेळाने ममता दीदींनी पुन्हा कम बॅक करत 2700 मतांची आघाडी घेतली. पण ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. नंतर लगेचच शुभेन्दु अधिकारी पुन्हा एकदा आघाडीवर गेले. नंदीग्राममधील मतमोजणीमुळे क्षणाक्षणाला अनेकांचा काळजाचा ठोका चुकत होता. 

Sanjay Raut : 'शेरणी हरली नाही ती जिंकली, ही देशासाठी सकारात्मक बाब' : संजय राऊत 

नंदीग्राममध्ये नंदीग्राम एक आणि नंदीग्राम दोन असे भाग पडतात. पहिल्या भागात शुभेन्दु अधिकारी आघाडीवर होते. दुसऱ्या भागातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर ममतादीदींनी आघाडी घेतली. सध्याच्या कलानुसार, तृणमूलने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना 213 च्या वर जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपनेही 77 जागांवर आघाडी घेतली आहे.

नंदीग्राममध्ये चुरशीने 88 टक्के मतदान झालं होतं. या मतदार संघात मुस्लिम मते निर्णायक आहेत. गेल्या निवडणूकीत तृणमूलचे उमेदवार असलेल्या शुभेन्दु अधिकारी यांनी डाव्या पक्षाच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. मागील 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीचा वोट शेअर 44.9 टक्के होता तर भाजपचा 10.2 टक्के होता. काँग्रेस लेफ्ट आघाडीला 37.9  टक्के मतं मिळाली होती तर इतरांच्या खात्यात 7 टक्के मतं होती.

महत्वाच्या बातम्या: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : पंजाबमधून राज्यसभेत जायचं की नाही? अरविंद केजरीवालांचं ठरलं, आम आदमीचा उमेदवार निश्चित
पंजाबमधून राज्यसभेत जायचं की नाही? अरविंद केजरीवालांचं ठरलं, आम आदमीचा उमेदवार निश्चित
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Rohit Sharma: रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं की स्वतःहून राजीनामा दिला? अजित आगरकरांनी स्पष्ट शब्दात केला खुलासा!
रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं की स्वतःहून राजीनामा दिला? अजित आगरकरांनी स्पष्ट शब्दात केला खुलासा!
अतिवृष्टीची मदत 2,500 रुपये जमा; शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवा; बळीराजाचा संताप, हेक्टरी 50,000 द्या
अतिवृष्टीची मदत 2,500 रुपये जमा; शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवा; बळीराजाचा संताप, हेक्टरी 50,000 द्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : पंजाबमधून राज्यसभेत जायचं की नाही? अरविंद केजरीवालांचं ठरलं, आम आदमीचा उमेदवार निश्चित
पंजाबमधून राज्यसभेत जायचं की नाही? अरविंद केजरीवालांचं ठरलं, आम आदमीचा उमेदवार निश्चित
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Rohit Sharma: रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं की स्वतःहून राजीनामा दिला? अजित आगरकरांनी स्पष्ट शब्दात केला खुलासा!
रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं की स्वतःहून राजीनामा दिला? अजित आगरकरांनी स्पष्ट शब्दात केला खुलासा!
अतिवृष्टीची मदत 2,500 रुपये जमा; शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवा; बळीराजाचा संताप, हेक्टरी 50,000 द्या
अतिवृष्टीची मदत 2,500 रुपये जमा; शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवा; बळीराजाचा संताप, हेक्टरी 50,000 द्या
India tour of Australia 2025 Squad: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-20 आणि वनडेमध्येही स्थान मिळवणारे ते 7 नशीबवान कोण! मोहम्मद शमीनं काय पाप केलं?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-20 आणि वनडेमध्येही स्थान मिळवणारे ते 7 नशीबवान कोण! मोहम्मद शमीनं काय पाप केलं?
Rohit Sharma Virat Kohli : रोहित शर्मा अन् विराट कोहली 2027 चा वर्ल्ड कप खेळणार की नाही? अजित आगरकरच्या वक्तव्यानं चाहत्यांना धक्का
रोहित अन् विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का? अजित आगरकरच्या वक्तव्यानं चाहत्यांना धक्का
महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने; एकीकडे कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, दुसरीकडे नेतेमंडळी एकत्र
महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने; एकीकडे कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, दुसरीकडे नेतेमंडळी एकत्र
रोहित विराटची वापसी, कॅप्टन बदलला, बंडखोर श्रेयसला लाॅटरी, हार्दिकच्या जागी सुद्धा आश्चर्यकारक निवड! बलाढ्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड समितीच्या 5 तगड्या निर्णयांची चर्चा
रोहित विराटची वापसी, कॅप्टन बदलला, बंडखोर श्रेयसला लाॅटरी, हार्दिकच्या जागी सुद्धा आश्चर्यकारक निवड! बलाढ्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड समितीच्या 5 तगड्या निर्णयांची चर्चा
Embed widget