Exit Poll 2022 Live Updates : पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल, पाहा प्रत्येक अपडेट्स
ABP C-Voter Exit Poll 2022: पाच राज्यांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने केलेल्या 'Exit Poll 2022'ची प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
ABP C-Voter Exit Poll 2022: पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल, मात्र अंतिम निकाल येण्याआधीच अनेकांनी आपले अंदाजपंचे निकाल मांडायला सुरुवात केली आहे. यात सर्वात जास्त लक्ष लागलं आहे ते उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे. भाजप युपीमध्ये पुन्हा आपली सत्ता स्थापन करणार का? भाजपला एकहाती बहुमत मिळणार का? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात आहेत.
आज एक्झिट पोलच्या (Exit Poll 2022) माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अचूक अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला जातो. एक्झिट पोलमधून तंतोतंत आकडेवारी समोर येत नसली, तरी मतदारांचे प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात शमतात. कारण एक्झिट पोलमधून वर्तवले जाणारे अंदाज हे बहुतांश वेळा अंतिम निकालाच्या जवळपास जाणारे असतात. आज रात्री साधारण आठ वाजता उत्तरप्रदेशच्या निकालाचे कल आपण एबीपी माझावर पाहू शकणार आहोत.
एक्झिट पोल जाहीर करायची वेळ काय?
एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर करण्यास परवानगी आहे. त्यानुसार आज, 07 मार्च रोजी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जाईल. एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे आपण एबीपी माझाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल.
संबंधित बातम्या :
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी सरकार
सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एकूण 403 सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी एकूण 202 जागांची गरज आहे. भाजपला यावेळीही स्पष्ट बहुमत मिळणार तर अखिलेश यादव सत्तेपासून दूर राहणार असंच या एक्झिट पोलमधून दिसतंय.
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमध्ये योगींकडेच सत्तेच्या चाव्या कायम - एक्झिट पोल
उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला दोन आकडी संख्या गाठणंही कठीण आहे. रिपब्लिकच्या पोलनुसार यूपीत भाजपला 240 जागा मिळू शकतात.
ABP Cvoter Goa Exit Poll Result 2022 : गोवा बहुमतापासून दूर 'हा' पक्ष ठरणार किंगमेकर
गोव्यात कुणालाही बहुमत मिळणार नाही, असा अंदाज एबीपी आणि सी वोटरने आपल्या सर्व्हेमध्ये व्यक्त केला आहे.गोव्यात सत्तेसाठी तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. भाजपला गोव्यात सर्वाधिक जागा मिळणार आहे. गोव्यात भाजपला 13 ते 17 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर कॉंग्रेसला 12 ते 16 जागा मिळणार आहे. आपला 1 ते 5, मगोपला 5 ते 9 आणि इतरांना 0 ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. सी व्होटरने दिलेल्या आकडेवारीनुसार मगोप किंगमेकरच्या भूमीकेत दिसणार आहे. आता मगोप कोणत्या पक्षाला पाठींबा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Uttar Pradesh: जागा घटणार पण उत्तर प्रदेशच्या सत्तेच्या चाव्या भाजपकडेच
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपच्या जवळपास 70 ते 80 जागांमध्ये घट होणार आहे. तर समाजवादी पक्षाच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचं या पोल्समध्ये सांगण्यात आलं आहे. असं असलं तरी सत्तेच्या चाव्या मात्र भाजपकडे कायम राहणार आहेत. एकूण 403 सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी एकूण 202 जागांची गरज आहे.
Uttar Pradesh :एक्झिट पोलमध्ये भाजपला पसंती
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी जागा जरी घटणार असल्या तरी उत्तर प्रदेशची बाजी भाजपच मारणार असल्याचं प्रमुख एक्झिट पोल्समधून स्पष्ट झालं आहे. रिपब्लिक टीव्ही, ईटीडी रिसर्च, न्यूज 18 आणि हिंदुस्थान टाईम्स या प्रमुख माध्यमांनी केलेल्या सर्व्हेमधून उत्तर प्रदेशचा गड भाजपच राखणार असून समाजवादी पक्षाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागणार आहे.