एक्स्प्लोर

Goa Exit Poll 2022: गोव्यात मुख्यमंत्री कुणाचा? मुख्य पक्षांसह आप-तृणमूलच्या एन्ट्रीने चुरस; अचूक एक्झिट पोल पाहा आज

Exit Poll 2022: देशातील छोट्या राज्यापैकी एक असलेल्या गोवा (Goa Election 2022) विधानसभेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. रात्री साधारण 7.30 वाजता निकालाचे कल आपण ABP Majhaवर पाहू शकणार आहोत. 

ABP C-Voter Exit Poll 2022: देशातील छोट्या राज्यापैकी एक असलेल्या गोवा (Goa Election 2022) विधानसभेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुख्य लढत जरी काँग्रेस-भाजपमध्ये होत असली तरी गोव्यात आप आणि तृणमूल काँग्रेसच्या एन्ट्रीनं चुरस वाढली आहे. महत्वाचं म्हणजे उत्पल पर्रीकरांसह अनेक अपक्षांनी देखील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. सोबतच शिवसेना देखील या निवडणुकीत जोमाने उतरलेली पाहायला मिळाली होती. 40 आमदार संख्या असलेल्या गोव्यात बहुमताचा आकडा हा 21 आहे. आम्ही 22 जागा जिंकणार असा दावा भाजप करत आहे तर काँग्रेसनं देखील सत्तेत येण्याचा दावा केला आहे. सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या.

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल, मात्र अंतिम निकाल येण्याआधीच अनेकांनी आपले अंदाजपंचे निकाल मांडायला सुरुवात केली आहे. यात अनेकांचं लक्ष लागलं आहे ते गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे. भाजप गोव्यामध्ये पुन्हा आपली सत्ता स्थापन करणार का? भाजपला एकहाती बहुमत मिळणार का? गोव्यात शिवसेना, तृणमूल, आपच्या एन्ट्रीने राजकारण बदलणार का? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात आहेत. 

आज एक्झिट पोलच्या (Exit Poll 2022) माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अचूक अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला जातो. एक्झिट पोलमधून तंतोतंत आकडेवारी समोर येत नसली, तरी मतदारांचे प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात शमतात. कारण एक्झिट पोलमधून वर्तवले जाणारे अंदाज हे बहुतांश वेळा अंतिम निकालाच्या जवळपास जाणारे असतात. आज रात्री साधारण 7.30 वाजता गोवाच्या निकालाचे कल आपण एबीपी माझावर पाहू शकणार आहोत. 

कसा आणि कुठे पाहाल गोवा निकालाचा एक्झिट पोल

एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर करण्यास परवानगी आहे. त्यानुसार आज, 07 मार्च रोजी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जाईल. एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे आपण एबीपी माझाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल. 

लाईव्ह टीव्ही- https://marathi.abplive.com/live-tv 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

या ठिकाणी आपण एक्झिट पोलचे अंदाज पाहू शकाल.

एक्झिट पोलचं सर्वेक्षण कसं घेतलं जातं? 

मतदानानंतर तात्काळ मतदारांचा कौल विचारुन गोळा केलेली आकडेवारी एक्झिट पोलसाठी वापरली जातो. संबंधित मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणारा ठराविक क्रमाकांचा (दहावा, विसावा, पंचविसावा) मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो. मतदान करुन आल्यानंतर कोणाला मत दिलं, असा थेट प्रश्न मतदाराला विचारला जातो. मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज वर्तवला जातो.  

एक्झिट पोल करणारी संस्था कोणत्या गोष्टी ध्यानात घेते? 

-कोणत्या टप्प्यामध्ये किती टक्के मतदान 
-नवमतदारांची संख्या
- मतदारांनी दिलेली माहिती, 
- एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थांनी मांडलेला निष्कर्ष
- राजकीय विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात. 

एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल वेगवेगळे का? 

ओपिनियन पोल मतदानापूर्वी सादर केला जातो, तर एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर. ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. मतदान होण्यापूर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतल्याने त्याचे निष्कर्ष बदलण्याची शक्यता असते. देशातील पहिला एक्झिट पोल कधी झाला? राजधानी दिल्लीतील सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस)ने केलेला एक्झिट पोल हा देशातील पहिला एक्झिट पोल मानला जातो. दूरदर्शनने 1996 साली देशातला पहिला एक्झिट पोल घेतला होता.

इतर महत्वाच्या बातम्या

ABP C-Voter Exit Poll 2022: पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा अचूक एक्झिट पोल एबीपी माझावर; कधी, कुठे पाहाल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget