Remote Voting : मतदारसंघापासून दूर राहणाऱ्यांना निवडणूक आयोगाचा दिलासा, रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु
Remote Voting Machine : मतदारसंघापासून दूर राहणाऱ्यांना नागरिकांना निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळणार आहे. लवकरच मतदारांसाठी रिमोट वोटिंग (Remote Voting) सुविधेची चाचपणी सुरु आहे.
Remote Voting Machine : घरापासून दूर राहणाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून (Election Commission) दिलासा मिळणार आहे. रिमोट वोटिंग (Remote Voting) सुविधा उपलब्ध करण्यात येण्यासाठी तयारी सुरु आहे. आयोगाकडून रिमोट वोटिंग (Remote Voting) सुविधेची चाचपणी सुरु आहे. आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या किंवा इतर शहरात आणि राज्यांमध्ये राहणाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिलासा देण्यासाठी आयोगाचा हा प्रयत्न आहे. ही सुविधा लागू झाल्यास इतर राज्य किंवा शहरांतून आता आपल्या मतदारसंघासाठी मतदान करणे शक्य होणार आहे. निवडणूक आयोगाने रिमोट वोटिंगच्या सुविधेबाबत तयारी सुरू केली आहे. ही प्रणाली यशस्वी झाली तर, इतर राज्यांत राहात असलेल्या मतदारांना दूर राहूनही आपल्या मतदारसंघात मतदान करता येणार आहे.
रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु
बाहेरगावी राहणाऱ्यांनाही मतदान करता यावे यासाठी निवडणून आयोग रिमोट वोटिंग सुविधा उपलब्ध करण्याची तयारी करत आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरु आहे. रिमोट वोटिंग सुविधेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करता येईल का यासाठीचा हा प्रयोग आहे. 16 जानेवारीला सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण यासंदर्भातील महत्त्वाच्या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये कायदेशीर, प्रशासकीय आणि तांत्रिक आव्हाने समजून घेण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.
रिमोट वोटिंग सुविधा उपलब्ध होणार
भारतीय निवडणूक आयोगाने दूरस्थ मतदान म्हणजेच रिमोट वोटिंग (Remote Voting) संकल्पनेबाबत निवेदन जारी केले आहे. यामध्ये रिमोट वोटिंग संकल्पना अंमलात आणण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय आव्हानांवर मते मागवण्यात आली आहेत. रिमोट वोटिंगला मान्यता मिळाल्यास इतर राज्यांत आणि शहरात राहणाऱ्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तुमच्या मतदारसंघापासून दूर राहूनही तुमच्या मतदारसंघात मतदान करू शकाल. तेथील निवडणुकीत तुम्ही तुमचे मत देऊ शकाल.
EC floats concept note on remote voting, seeks views of parties on legal and administrative challenges in implementing it
— Press Trust of India (@PTI_News) December 29, 2022
तुमच्या मतदारसंघापासून दूर राहून मतदान करता येणार
या रिमोट वोटिंगची संकल्पनेची अंमलबजावणी झाल्यास तुम्हाला मतदानासाठी तुमच्या दूर असलेल्या मतदारसंघात जाण्याची गरज भासणार नाही. तुम्ही जिथे राहत आहेत ते तिथूनच तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी मतदन करु शकाल. इतर राज्यात राहणारे विद्यार्थी आणि कर्मचारी तसेच स्थलांतरित मजुरांना देखील या निवडणूक प्रक्रियेचा फायदा होईल. निवडणूक आयोग लवकरच यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या तयारीत आहे.