एक्स्प्लोर
गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान आता दंडनीय अपराध
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेले पर्यटक दारुच्या दुकानांसमोर आणि बीचवर दारु पिऊन बाटल्या तिकडचे टाकून जात असल्याचे आढळून आले होते.
पणजी : समुद्रकिनारी बसून निवांत दारु पिण्यासाठी गोव्याचा मार्ग धरणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. पुढील महिन्यापासून गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं दंडनीय अपराध ठरणार आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या नव्या नियमाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे दारुच्या सेवनामुळे नाही, तर दारुच्या रिकाम्या बाटल्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची गोवा सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
पणजीमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्धाटनानंतर पर्रिकरांनी ही माहिती दिली. येत्या 15 दिवसात कायद्यात तरतूद करुन त्याची फेब्रुवारी महिन्यापासून कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच गोव्यात पर्यटकांची गर्दी होते. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी देशाच्या विविध भागातून आणि परदेशातून आलेले पर्यटक दारुच्या दुकानांसमोर तसंच बीचवर दारु पिऊन बाटल्या तिकडेच टाकून जात असल्याचं आढळलं होतं.
त्यामुळे कचरा उचलून साफ सफाई करण्याचं सरकारी यंत्रणेचं काम वाढलं आहे.
गोव्यात यासंबंधी कायदा आल्यास यापुढे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं तुम्हाला महागात पडू शकतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement