एक्स्प्लोर

Stand-Off Anti-Tank Missile : भारतीय हवाई दलाचा ताफा आणखी बळकट, SANT रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

Stand-Off Anti-Tank Missile : भारताची हवाई ताकद आणखी बळकट झाली आहे. स्टँड-ऑफ अँटी टँक (SANT) या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे.

Stand-Off Anti-Tank Missile : भारतीय हवाई दलाची (Indian Air Force) ताकद आणखी बळकट झाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय हवाई दल (IAF) यांची रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. 11 डिसेंबर 2021 रोजी पोखरण येथील स्वदेशी बनावटीच्या आणि विकसित केलेल्या हेलिकॉप्टरद्वारे स्टँड-ऑफ अँटी टँक (SANT) या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. क्षेपणास्त्र मुक्त करण्याची यंत्रणा (Release Mechanism), प्रगत मार्गदर्शन (Advanced Guidance) आणि ट्रॅकिंग अल्गोरिदम (Tracking Algorithms), एकात्मिक सॉफ्टवेअर (Integrated Software) सह सर्व यंत्रणांनी चोख कामगिरी बजावली. ट्रॅकिंग प्रणालीने संपूर्ण उपक्रमाचे निरीक्षण केले. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक एमएमडब्ल्यू (MMW Technology) सीकरने सुसज्ज असून यामध्ये सुरक्षित अंतरावरून उच्च दर्जाची अचूक मारक क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र 10 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्यातील लक्ष्य भेदून निष्प्रभ करू शकते.

 

स्टॅन्ड ऑफ अँटी-टँक (SANT) हे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमारत (RCI)  आणि डीआरडीओच्या समन्वयाने तसेच उद्योगांच्या सहभागातून विकसित करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाचा ताफा बळकट करण्यासाठी लांब पल्ल्याचा बॉम्ब आणि स्मार्ट अँटी एअरफील्ड क्षेपणास्त्रांची चाचणी सुरु आहे. अलीकडच्या काळात चाचणी करण्यात आलेल्या स्वदेशी स्टँड-ऑफ शस्त्रास्त्रांच्या मालिकेतील हे तिसरे क्षेपणास्त्र आहे. प्रगत तंत्रज्ञानासह विविध वैशिष्टयांनी युक्त हे स्वदेशी क्षेपणास्त्र संरक्षणातील आत्मनिर्भरतेकडे एक ठोस पाऊल आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या मोहिमेशी संबंधित पथकाचे अभिनंदन केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी म्हणाले की, ''स्टॅन्ड ऑफ अँटी-टँक-SANT क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीमुळे स्वदेशी संरक्षण क्षमतांना अधिक बळ मिळेल.''

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Embed widget