एक्स्प्लोर
बँकेकडून 100 ऐवजी, 10, 20 किंवा चिल्लरही हातात येऊ शकते!

मुंबई : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात तुम्ही शंभरच्या कोऱ्या-करकरीत नोटांची अपेक्षा केली असेल, तर तसं होईलच असं नाही. कारण, शंभरच्या नोटांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने तुम्हाला बदली नोटा म्हणून 10, 20 किंवा अगदी चिल्लरही बँकेकडून मिळू शकते. अंधेरीतील पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मॅनेजर यांनी तसं आवाहन केलं आहे. "सध्या बँकेत फार कॅश नाही. आवश्यक तेवढीच रक्कम काढा. शंभरच्या नोटा मिळतीलच असं नाही. कॅशियर ज्या नोटा देतील, त्या घ्या. इतरांनाही पैसे द्यायचे आहेत. तुम्ही काऊंटरव येऊन हल्ला कराल, तर ते चालणार नाही. त्यामुळे आज स्वार्थी बनू नका," असं बँक मॅनेजरनी सांगितलं. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासूनच बँका सुरु झाल्याने सर्वसामान्यांनी नोटा बदलण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याने काल बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज नोटा बदलण्यासाठी तसंच पैसे जमा करण्यासाठी बँके आणि पोस्ट ऑफिसमध्ये चांगलीच झुंबड उडणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण























