एक्स्प्लोर

US Vs India : ट्रम्प यांनी भडकावले, भारताच्या विरोधात प्लॅन बनवत आहेत 'हे' सात शक्तिशाली देश

US Tariff On India : G7 देशांकडून भारतावर आयात शुक्ल वाढवणे किंवा निर्यात बंदी सारख्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात. तसे संकेत या समूहाने दिले आहेत.

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर जबरदस्त टॅरिफ (US Tariff On India) लावल्यानंतर आता भारतासमोरिल अडचणी पुन्हा एकदा वाढण्याच्या शक्यता आहे. कारण जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्रांचा समूह अशी ओळख असलेल्या G7 गटाकडूनही (Group of Seven Countries) भारतावर आयात शुल्क वाढ किंवा निर्यात बंदीची कारवाई होण्याची शक्यता आहे. निर्बंध घातल्यानंतरही रशियाकडून तेल (Russian Oil) आयात करणाऱ्या देशांवर आयात शुक्ल वाढीसाठी किंवा निर्यात बंदीसारख्या उपाययोजना करणार असल्याचं जी 7 गटाने स्पष्ट केलं. त्याचा फटका भारत आणि चीनला बसण्याची शक्यता आहे.

भारत आणि चीन हे दोन देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतात. रशिया तेल व्यापारातून कमावलेला पैसा हा युक्रेन (Russia Ukrain War) विरोधात युद्धासाठी वापरतो असा आरोप अमेरिका आणि जी 7 देशांनी केला आहे. त्यामुळे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांविरोधात कारवाई करण्यासाठी जी 7 देश सरसावल्याचं चित्र आहे.

Donald Trump Proposal To G7 : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुढाकार

अमेरिकेचे (United States) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 देशांना विनंती केली होती की जे देश रशियातून तेल (Russian oil) खरेदी करतात, त्यांच्यावर शुल्क (tariff) लावले जावे. अमेरिकेचे म्हणणे आहे की, केवळ एकत्रित प्रयत्नांनीच मॉस्कोच्या युद्धयंत्राला आवश्यक निधी पोहोचण्याचा स्रोत बंद करता येईल.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतरही ज्यांनी रशियाकडून तेल आयात कायम ठेवले आहे अशा देशांवर आपले लक्ष असल्याचं जी 7 देशांनी स्पष्ट केलं आहे. अशा देशांवर व्यापार प्रतिबंध, आयातनिर्यात बंदी आणि शुल्क वाढवण्यासारखे निर्णय होऊ शकतात. जी 7 देशांचा रोख हा भारत आणि चीनवर असल्याचं यातून स्पष्ट आहे.

G7 Countries List : जी 7 गटात कोणते देश?

जी 7 गटात अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि ब्रिटन या देशांचा समावेश आहे. या वर्षी कॅनड G7 परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे.

G7 देशांनी संयुक्त घोषणा केली आहे की ते रशियन तेल (Russian oil) जास्त प्रमाणात खरेदी करणाऱ्या देशांविरुद्ध कडक पावल उचलतील. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर आयात-निर्यात बंदी (import export bans), शुल्क (tariffs) वाढवणे अशी पाऊले उचलली जाणार आहेत. या निर्णयाचा फटका भारत आणि चीनला बसणार आहे हे स्पष्ट आहे. कारण हे दोन देशच रशियाच्या तेलाचे मोठे खरेदीदार देश आहेत.

International Tariff Impact On India : भारतावर काय परिणाम होऊ शकतात?

जर G7 देश हे भारतीय वस्तुंवरील आयात शुल्क वाढवतील किंवा निर्बंध लावतील तर भारतीय निर्यातदारांना अमेरिकेत आणि इतर बाजारांमध्ये मोठ्या आर्थिक दबावाचा सामना करावा लागू शकतो.

ऊर्जा खर्च वाढू शकतो - जर भारताला उर्जा निर्मितीसाठी स्वस्त विकल्प मिळाला नाही तर सामान्य जनता आणि उद्योग वर्ग दोघांनाही परिणाम भोगावा लागेल.

भारताला आपली ऊर्जा सुरक्षितता (energy security) पुन्हा तपासावी लागेल. त्यासाठी तेलाव्यतिरिक्त विविध स्रोतांकडे वळावे लागेल. तसेच रशिया व्यतिरिक्त इराण, व्हेनेझुएला किंवा इतर देशांकडून तेल खरेदी करावे लागेल.

जी 7 देशांनी जर भारतावर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला तर भारतासोबतच्या त्या देशांच्या व्यापारी संबंधावर (trade tension) परिणाम होऊ शकेल. या गटासोबत, विशेषतः अमेरिकेसोबतचे संबंध ताणू शकतात.

India US Relation : अमेरिका-भारत दरम्यान शुल्काचा तणाव

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आधीच भारतावर 50 टक्के टॅरिफ (tariff) लावला आहे, तर चीनसाठी तो 30 टक्के ठेवला आहे. परिणामी भारतीय निर्यातदारांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आता जर जी 7 देशांनीही तसा निर्णय घेतला तर भारताच्या परकीय व्यापारामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget