एक्स्प्लोर

Coronavirus | भारताचा प्रवास करू नका, अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आवाहन

India Covid-19 Second Wave : भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, अशा वेळी भारताचा प्रवास करू नये असं आवाहन अमेरिकेने आपल्या देशातील नागरिकांना केलं आहे. 

वॉशिंग्टन : भारतात कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवत असताना जगभरातील देश सावध झाले आहेत. भारतातील परिस्थिती चिंताजनक आहे, त्यामुळे त्या देशाचा प्रवास करु नये असं आवाहन अमेरिकेने आपल्या नागरिकांना केलं आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या तब्बल 2.73 लाख नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांना वरील आवाहन केलं आहे.

भारतातील कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतचं चाललं आहे. त्यामुळे त्या देशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. अशा काळात भारतात जाऊ नये असं आवाहन अमेरिकनेन त्याच्या नागरिकांना केलं आहे. 

ब्रिटनने भारताला 'रेड लिस्ट' मध्ये टाकलं
भारतातील कोरोनाचं संकट पाहता ब्रिटनकडून भारताची नोंद रेड लिस्टमध्ये करण्यात आली आहे. सदर यादीत नोंद झाल्यामुळं आता भारतीय आणि आयरिश नागरिकांना भारतातून ब्रिटनमध्ये जाण्यावर निर्बंध असतील. यासोबतच परदेशातून परतलेल्या ब्रिटनच्या नागरिकांनाही इथं एका हॉटेलमध्ये 10 दिवसांसाठी विलगीकरणात रहावं लागणार आहे. भारतात आढळलेल्या संसर्गाच्या प्रकारचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी अधिक रुग्ण हे परदेशातून परतलेले आहेत. समोर आलेल्या रुग्णसंख्येच्या विश्लेषणानंतरच भारताचं नाव रेड लिस्टमध्ये समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं आता भारतीयांच्या ब्रिटन प्रवेशावर निर्बंध आले आहेत. दरम्यान, सदर निर्णयाच्या काही तासांपूर्वीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पुढील आठवड्यातील नियोजित भारत दौराही रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. 

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2.73 लाख कोरोनाबाधितांचा आकडा समोर आला आहे. तसेच 1 हजार 501 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात दिलासा देणारी बाब म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 1.38 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं
या गोष्टी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ठराल अपात्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात..Rahul Gandhi vs Amit Shah : अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक ABP MajhaSachin kharat On Deekshabhoomi :  दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंग होणं अत्यंत चुकीचं : सचिन खरातAmbadas Danve : लोकशाहीचा गळा सातत्याने घोटला जातोय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं
या गोष्टी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ठराल अपात्र
Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच मध्य प्रदेशात हादरवणारं दृश्य, आढळले 5 मृतदेह
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच घरात आढळले लटकलेले संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह
Zika Virus:  पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Embed widget