एक्स्प्लोर

Oxygen suppliers shares | ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांची शेअर मार्केटमध्ये चांदी, नावात केवळ 'ऑक्सिजन' असल्यानेही शेअर्स खरेदी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा निर्माण झाला असताना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मजेशीर म्हणजे नावात केवळ ऑक्सिजन आहे अशा कंपन्यांच्या शेअर्समध्येही विक्रमी वाढ झाली आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोजच विक्रमी वाढ होत आहे. महाराष्ट्र आणि इतर प्रमुख राज्यांत ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. याचा फायदा आता ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना झाला असून शेअर मार्केटमध्ये त्यांची चांदी झाल्याचं दिसून येतंय. या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. महत्वाचं म्हणजे काही कंपन्यांच्या नावात केवळ ऑक्सिजन हा शब्द आहे म्हणूनही त्यांच्या शेअर्समध्येही वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

नॅशनल ऑक्सिजन, भगवती ऑक्सिजन, लिन्डे इंडिया आणि गगन गॅसेस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा तुटवडा आहे. त्यामुळे या कंपन्यांना जास्तीच्या ऑक्सिजनची निर्मिती करण्यास केंद्राने मुभा दिली आहे. त्याचा परिणाम म्हणजे या दोन महिन्यांच्या काळात संबंधित कंपन्यांच्या भावात वाढ झाली आहे. अनेक गुंतवणूकदारांनी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. 

शासनाने 22 एप्रिलला एक निर्णय घेऊन ऑक्सिजनचा वापर औद्योगिक कारणासाठी करण्यावर बंदी आणली आहे. याला अपवाद फक्त नऊ विशेष कंपन्या आहेत. देशात ऑक्सिजनच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 2.73 लाख नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तसेच 1,619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात ऑक्सिजनच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. 

कोणत्या कंपनीच्या शेअर्समध्ये किती पटींनी वाढ?
नॅशनल ऑक्सिजन लिमिटेडच्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या आठवड्यात 21 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच गेल्या एकाच महिन्यात या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 75 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

लिन्डे इंडियाच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात 12.60 टक्क्यांची वाढ झाली आहे तर गेल्या महिन्यात त्याच्या किंमतीत 113 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

गगन गॅसेस लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात 21 टक्क्यांची तर गेल्या महिन्यात 53 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

भगवती ऑक्सिजनच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात 15 टक्के तर गेल्या महिन्यात 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

कंपनीच्या नावात केवळ 'ऑक्सिजन' शब्द आहे म्हणून शेअर्स खरेदी 
ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ तर झालीच आहे पण काही कंपन्यांच्या नावात केवळ 'ऑक्सिजन' हा शब्द आहे म्हणून त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय. बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेन्ट ही कंपनी कोणत्याही ऑक्सिजनची निर्मिती करत नाही. पण या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात 33 टक्के तर गेल्या महिन्याभरात तब्बल 144 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलंय. या कंपनीकडून गॅस उत्पादन ऑगस्ट 2019 सालीच बंद करण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Joe Biden : ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Mumbai : टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करणार, ओपन बसमधून व्हिक्ट्री मार्च काढणारABP Majha Headlines : 5 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmbadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यताMaharashtra Assembly Session : दानवेंंचं निलंबन ते मुंबईतील पाणीपुरवठा; विधानसभेत काय काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Joe Biden : ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
''अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावे, मी मंत्री व्हावे''; विजय शिवतारेंचं पांडुरंगाला मागणं
''अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावे, मी मंत्री व्हावे''; विजय शिवतारेंचं पांडुरंगाला मागणं
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई - एकनाथ शिंदे
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई - एकनाथ शिंदे
लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अकोला,अमरावतीसह बुलढाण्यात कारवाईचे सत्र
लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अकोला,अमरावतीसह बुलढाण्यात कारवाईचे सत्र
Vidhan Parishad Election : मविआला चार तर महायुतीला सहा अतिरिक्त मतांची गरज, जुळवाजुळव कशी करणार? कुणाचे आमदार फुटणार? 
मविआला चार तर महायुतीला सहा अतिरिक्त मतांची गरज, जुळवाजुळव कशी करणार? कुणाचे आमदार फुटणार? 
Embed widget