एक्स्प्लोर
आठवलेंच्या स्वीय सहाय्यक पदी देवयानी खोब्रागडेंची नियुक्ती
नवी दिल्ली: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून परराष्ट्र सेवेत अधिकारी राहिलेल्या देवयानी खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परराष्ट्र सेवेत अधिकारी राहिलेल्या देवयानी खोब्रागडे यांना तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत भारतीय नोकराचे आर्थिक शोषण आणि व्हिसा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरुन भारत आणि अमेरिकेतील संबंधात तणाव निर्माण झाला होता. याचवेळी आरपीआय आणि रामदास आठवले यांनी देवयानी खोब्रागडे यांची पाठराखण केली होती.
देवयानी यांच्यावरील कारवाईविरोधात भारताने कठोर भूमिका घेतली होती. अनेक आठवडे भारत आपल्या भूमिकेवर ठाम होता. भारताच्या या भूमिकेमुळे अमेरिकन सरकारनं देवयानी यांच्यावर खटला न चालवण्यासाठी तयार झालं आणि त्यांना भारतात पाठवलं होतं. अमेरिकतील भारताच्या वाणिज्य दूतावासात देवयनी या उच्च-उपायुक्तपदावर कार्यरत होत्या.
देवयानी खोब्रागडे या माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आहेत. उत्तम खोब्रागडे हे सध्या रिपाई पक्षात कार्यरत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement