दिल्ली हिंसाचार प्रकरण: आरोपी दिलशाद आणि गुल्लीला तीन दिवसांची पोलिस कोठडी
Jahangirpuri Violence: दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराचा पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.
![दिल्ली हिंसाचार प्रकरण: आरोपी दिलशाद आणि गुल्लीला तीन दिवसांची पोलिस कोठडी Delhi violence case: Accused Dilshad and Gulli remanded in police custody for three days दिल्ली हिंसाचार प्रकरण: आरोपी दिलशाद आणि गुल्लीला तीन दिवसांची पोलिस कोठडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/6f532f19a5f085f5c28c461ac71c7ad6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jahangirpuri Violence: दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराचा पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना अटक केली आहे. एवढेच नाही तर सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना 30 फोन नंबरही मिळाले आहेत. ज्यामुळे जहांगीरपुरी हिंसाचाराचे संपूर्ण सत्य समोर येईल. हे 30 फोन नंबर अन्सार, सोनू आणि एका अल्पवयीन आरोपीशी जोडलेले आहेत. गुन्हे शाखेचे पथक घटनेच्या ठिकाणाहून अन्सार, अस्लम आणि सोनूचे कॉल डिटेल रेकॉर्ड शोधण्यात गुंतले आहे. याच दरम्यान, दिल्ली हिंसाचारातील आरोपी दिलशाद आणि गुल्ली यांना न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायाधीशांनी दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या हिंसाचार प्रकरणाबाबत पोलीस आता दोघांची चौकशी करणार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारात वापरलेले पिस्तूल पुरवणाऱ्या गुलाम रसूल उर्फ गुल्लीने घटनेच्या दिवशी अनेक अल्पवयीन मुलांना शस्त्रे दिल्याचे चौकशीत सांगितले आहे. गोळीबार करणाऱ्या सोनू उर्फ चिकना उर्फ युसूफ याला गुल्लीने 10 हजार रुपयांसाठी पिस्तूल दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीरपुरी हिंसाचाराशी संबंधित व्हिडीओ, फोटो, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक इनपुटच्या आधारे गुन्हे शाखेने सुमारे 300 बदमाशांची ओळख पटवली आहे. त्याच्या अटकेसाठी छापे टाकण्यात येत आहेत.
या प्रकरणाचा तपास करत असताना दिल्ली पोलिसांनी अवैध शस्त्र पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. चकमकीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीवर 60 हून अधिक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. जहांगीरपुरी हिंसाचारासाठीही शस्त्र पुरवल्याचा त्यावर संशय आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Delhi : जहांगीरपुरी भागात अवैध बांधकामांवर बुल्डोझर, हिंसाचारानंतर कठोर तोडक कारवाईचा निर्णय
- Delhi : जहांगीरपुरी भागात अवैध बांधकामांवर तोडक कारवाई, हिंसाचारानंतर कठोर कारवाईला सुरुवात; जाणून घ्या सध्याची परिस्थिती
- Delhi Violence : दिल्लीतील दगडफेक प्रकरणी चौथी FIR दाखल, गोळीबार करणारा आरोपी अटकेत; जाणून घ्या आतापर्यंतचे अपडेट्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)