Jahangirpuri Violence : जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात मोठी अपडेट, सीसीटीव्ही आणि व्हिडीओंवरून 300 आरोपींची ओळख पटली
Jahangirpuri Violence Update : दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत सुमारे 300 आरोपींची ओळख पटवली आहे, त्यांच्या अटकेसाठी छापे टाकले जात आहेत.
Delhi Jahangirpuri Violence Update : दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हिंसाचार प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत सुमारे 300 आरोपींची ओळख पटवली आहे, त्यांच्या अटकेसाठी छापे टाकले जात आहेत. या प्रकरणी आतापर्यंत अस्लम, अन्सार, सोनू चिकनासह 26 जणांना अटक करण्यात आली असून त्यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत तपासात सुमारे 300 आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरु आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीरपुरी हिंसाचाराशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओ, फोटो आणि तपासाच्या आधारे गुन्हे शाखेने सुमारे 300 आरोपींची ओळख पटवली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत गुन्हे शाखेकडून वेगवान कारवाया सुरु आहेत.
30 फोन नंबरची होणार चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने हिंसाचाराशी संबंधित 30 फोन नंबर तपासण्यात गुंतले आहे. हे ३० नंबर अन्सार, अस्लम आणि सोनूशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या नंबरच्या लोकेशनपासून ते कॉल डिटेलपर्यंतच्या रेकॉर्डची छाननी केली जाईल, ज्यामुळे जहांगीरपुरी हिंसाचाराचे संपूर्ण सत्य समोर येईल असे मानले जात आहे.
जहांगीरपुरी भागात अवैध बांधकामांवर बुल्डोझर
दिल्ली महानगरपालिकेने (MCD) बुल्डोझरने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. एच ब्लॉकमध्ये अनेक बांधकामं हटवण्यात आली असून सध्या तोडक कारवाईला कोणताही विरोध झालेला नाही. दिल्लीत हनुमान जयंती दिवशी झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणात रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. सध्या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. त्यानंतर आता पालिकेने अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून घटनास्थळी 400 पोलीस कर्मचारी तैनात आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Delhi : जहांगीरपुरी भागात अवैध बांधकामांवर तोडक कारवाई, हिंसाचारानंतर कठोर कारवाईला सुरुवात; जाणून घ्या सध्याची परिस्थिती
- Delhi Violence : दिल्लीतील दगडफेक प्रकरणी चौथी FIR दाखल, गोळीबार करणारा आरोपी अटकेत; जाणून घ्या आतापर्यंतचे अपडेट्स
- Amway Money Laundering : अॅमवेवर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त; जाणून घ्या प्रकरण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha