Delhi Election 2020 Opinion Poll : मुख्यमंत्रीपदी पुन्हा केजरीवाल यांनाच पसंती
एबीपी न्यूजच्या सर्व्हेनुसार 69.50 टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पसंती दर्शवली आहे. तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 10.7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
![Delhi Election 2020 Opinion Poll : मुख्यमंत्रीपदी पुन्हा केजरीवाल यांनाच पसंती Delhi Election 2020 Opinion Poll : Arvind Kejriwal AAP will win election once again Delhi Election 2020 Opinion Poll : मुख्यमंत्रीपदी पुन्हा केजरीवाल यांनाच पसंती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/06205714/Arvind-Kejriwal-Anit-Shah-Sonia-Gandhi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. विधानसभेसाठी दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 11 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येतील. आज दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीच्या निकालासंदर्भात एबीपी न्यूजने घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनाच पसंती मिळाली आहे.
एबीपी न्यूजच्या सर्व्हेनुसार 69.50 टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पसंती दर्शवली आहे. तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 10.7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. काँग्रेसचे अजय माकन तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 7.1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. आम आदमी पार्टीचे मनिष सिसोदिया चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 2.2 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर भाजपच्या विजय गोयल यांना केवळ 1.1 टक्के मतं मिळाली आहेत.
प्रश्न : AAP च्या नेतृत्वाखालील सरकार त्वरीत बदलण्याची इच्छा आहे का? दिल्लीकरांना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 70.40 टक्के दिल्लीकरांनी सांगितले की, आपचं सरकार त्वरीत बदलण्यास आम्ही उत्सूक नाही. 27 टक्के लोकांनी हे सरकार बदलण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. 2.60 टक्के लोकांनी हे उत्तर ठरवण्यात असमर्थता दर्शवली.
प्रश्न :अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवू इच्छिता का? या प्रश्नावर उत्तर देताना 71.20 टक्के लोकांनी 'नाही' असे उत्तर देत केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला. 26 टक्के लोकांनी सांगितले की, मुख्यमंत्रीपदावरुन केजरीवाल यांना हटवणे आवश्यक आहे.
प्रश्न :पंतप्रधान बदलण्याची आवश्यकता आहे का? 63.30 टक्के दिल्लीकरांनी सांगितले की, नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी योग्य आहेत. 34 टक्के लोकांनी सांगितले की, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदावरुन हटवणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रश्न : दिल्लीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? एबीपी न्यूज-सी वोटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष 70 पैकी 59 जागा जिंकेल. आम आदमी पार्टीने मागील निवडणुकीत 67 जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच केजरीवाल यांच्या पक्षाच्या 8 जागा कमी होतील. भारतीय जनता पक्ष 8 जागांवर जिंकू शकतो. तर काँग्रेसला केवळ तीन जागांवर विजय मिळेल. त्यामुळे अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा सत्तेत बसतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)