एक्स्प्लोर
Advertisement
Delhi Opinion Poll | दिल्लीकरांचा विश्वास केजरीवालांवरच, पुन्हा सत्ता 'आप'च्या हाती, सर्व्हेचा अंदाज
दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार खडाजंगी सुरु आहे. सत्ताधारी 'आप' आपल्या विकासकामांना दाखवत मैदान लढवत आहे तर भाजपकडून देखील दिल्लीकरांवर आश्वासनांची बरसात केली जात आहे. तर काँग्रेस देखील टीच्चून मैदानात उभी आहे. निकाल 11 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे, त्याआधी सर्वेतला हा अंदाज.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी तीन दिवसांचा वेळ बाकी आहे. 8 फेब्रुवारीला एकूण 1,47,03,692 मतदाता आपला मताधिकार बजावतील. या निवडणुकांचे निकाल 11 फेब्रुवारीला हाती येणार आहेत. त्याआधी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने दिल्लीतील जनतेच्या मनात काय? याबाबत एक सर्वे केला आहे. या सर्वेतील अंदाजानुसार आकडेवारीचे काही अंदाज समोर आले आहेत. या अंदाजानुसार दिल्लीत पुन्हा सत्ता ही आपच्याच हाती राहणार आहे. काही जागांवर फटका बसत असला तरी राजधानी दिल्लीत पुन्हा आपचीच एकहाती सत्ता येणार असल्याचा अंदाज आहे. ABP Opinion Poll च्या अंदाजानुसार, सत्ताधारी आम आदमी पार्टीला कमीत कमी 42 तर अधिकाधिक 56 जागा मिळू शकतात. भाजपला कमीत कमी 10 तर अधिकाधिक 24 तर काँग्रेसला कमीत कमी 0 तर अधिकाधिक 4 जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं सर्वेत म्हटलं आहे.
कुणाला किती जागा मिळणार?
पक्ष जागा
आप 42 ते 56
भाजप 10 ते 24
काँग्रेस 0 ते 4
इतर 0
कुणाला किती मतं मिळणार?
पक्ष मतांची टक्केवारी
आप 45.6 %
भाजप 37.1 %
काँग्रेस 4.4 %
इतर 12.9%
केजरीवाल यांना लोकं बाहेरचं समजतात?
होय 21%
नाही 72%
माहिती नाही 7%
केजरीवालांवर वैयक्तिक आरोप करण्यानं भाजपचं नुकसान होणार?
होय 48%
नाही 24%
फरक नाही पडणार 4%
माहिती नाही 24%
अमित शाह यांच्या धुवाधार प्रचारानं दिल्लीचं चित्र पालटणार?
होय 53%
नाही 36%
माहिती नाही 11%
पीएम मोदींच्या प्रचारसभेचा भाजपला फायदा होणार?
होय 61%
नाही 29%
माहिती नाही 10%
2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 जागांपैकी 67 जागांवर दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला खातं देखील उघडता आलेलं नव्हतं.
हा सर्वे एबीपी न्यूजने सी-व्होटरसोबत हा सर्वे केला आहे. यासाठी 26 जानेवारी 2020 ते 4 फेब्रुवारी 2020 पर्यंत लोकांशी चर्चा केली. या सर्वेसाठी दिल्लीतील 70 विधानसभा जागांसंदर्भात 11,188 लोकांसोबत चर्चा करुन त्यांची मतं जाणून घेण्यात आली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement