Wrestler Case: पॉक्सो प्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चिट; दिल्ली पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल
Wrestler Case: दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तपासाची सूत्रं वेगानं हलवण्यास सुरुवात केली होती. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अनेक कांगोरे तपासले आणि आज अखेर राऊज एवेन्यू कोर्टात तब्बल हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे.
Wrestler Protest: भारतीय कुस्ती परिषदेचे Wrestling Federation of India (WFI) सर्वेसर्वा आणि खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पोक्सो (POCSO) नुसार दाखल गुन्ह्यासाठी समर्पक पुरावे आढळून येत नसल्यानं हे गुन्हे रद्द करावेत, अशी याचिका दिल्ली पोलिसांनी कोर्टाला केली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आज कुस्ती परिषदेच्या बृजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणं अपेक्षित होतं. मात्र त्याऐवजी त्यांनी क्लोजर रिपोर्ट म्हणजे सबळ पुराव्याअभावी (Corroborative Evidence) गुन्ह्याचा तपास बंद करण्याची अनुमती कोर्टाकडे मागितल्याची माहिती आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारलं होतं. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलं. त्यावेळी क्रीडामंत्र्यांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करुन कारवाई करण्याचं आश्वासन कुस्तीपटूंना दिलं होतं. तेव्हापासूनच दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तपासाची सूत्रं वेगानं हलवण्यास सुरुवात केली होती. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अनेक कांगोरे तपासले आणि आज अखेर राऊज एवेन्यू कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांनी अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे.
दिल्ली पोलिसांची बृजभूषण सिंहांना 'क्लीन चिट'
अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे. 7 कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवरून दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दोन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 6 प्रौढ महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात राऊस अॅव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. तर दुसरे आरोपपत्र पतियाळा न्यायालयात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले. अल्पवयीन मुलाने लावलेल्या आरोपांमध्ये दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांना क्लीन चिट दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी रोज अव्हेन्यू कोर्टात भारतीय कुस्ती परिषदेचे सर्वेसर्वा खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचे आरोपपत्र दाखल करण्यात येणार होतं. याच प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून ऑलिम्पिकपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्वात जंतर मंतर येथे धरणे आंदोलन सुरु आहे. बृजभूषण यांच्याविरोधात दाखल तब्बल तीन एफआयआर प्रकरणी कारवाई होऊन त्यांना अटक करावी अशी मागणी हे कुस्तीपटू करत आहेत. मात्र दिल्ली पोलिसांनी कायमच त्यांना पाठीशी घालण्याची भूमिका घेतली आहे. यापूर्वी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना मारहाण करुन हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
बृजभूषण यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करावा, दिल्ली पोलिसांची कोर्टात विनंती
पोक्सो कायदा म्हणजे, अल्पवयीन पीडितेवर अत्याचार केल्याबद्धल गंभीर शिक्षेची तरतूद असलेला कायदा आहे. या कायद्यात जामिनाचीही तरतूद नाही. मात्र या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याइतपत सबळ पुरावे नसल्याचं सांगत दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात दिल्ली पोलिसांनी खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात पोक्सो कलमान्वये दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती केलीय. या विनंती अर्जावर 4 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
गुन्हा दाखल केल्यानंतर, त्याचा तपास करताना जेव्हा आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध करण्याइतपत सबळ पुरावे आढळत नाहीत तेव्हा पोलिसांकडून आरोपीविरुद्ध दाखल गुन्हे रद्द करण्यासाठी कॅन्सलेशन रिपोर्ट कोर्टात सादर केला जातो. त्यावर सक्षम कोर्टात सुनावणी होते.