एक्स्प्लोर
JNUSU ची अध्यक्ष आयशी घोषसह 19 विद्यार्थ्यांवर गुन्हा
जेएनयूमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. हातात लाठ्या-काठ्या, रॉड, हॉकी स्टिक, दगड घेऊन मास्क घालून आलेल्या हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली.
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्यानंतर दिल्ली पोलिस कार्यरत झाली आहे. मास्क घालून विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र याचवेळी पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषवर गुन्हा दाखल केला आहे. 4 जानेवारी रोजी जेएनयूच्या सर्व्हर रुममध्ये तोडफोड आणि सुरक्षारक्षकांवर हल्ला केल्याच्या आरोपात आयशी घोष आणि 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरच्या आरोपी रकान्यात इतर विद्यार्थ्यांच्या नावाचा उल्लेख नाही. परंतु डिटेल्समध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे.
घोष आणि इतरांवर तोडफोडीचा आरोप जेएनयू प्रशासनाच्या तक्रारीनंतर विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष आणि इतर विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर 4 जानेवारीला सर्व्हर रुमची तोडफोड करणे आणि उपस्थित सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. जेएनयू प्रशासनाने 5 जानेवारीला तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 5 जानेवारीला हॉस्टेलमध्ये हिंसाचार जेएनयूच्या तीन हॉस्टेलमध्ये 5 जानेवारीच्या संध्याकाळी जोरदार राडा झाला. अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली तसंच तोडफोडही केली. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषवरही हल्ला करण्यात आला. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हल्लेखोरांना आतापर्यंत पकडलेलं नाही. पण मास्कधारी हल्लेखोरावर जोरदार राजकारण सुरु झालं आहे. हल्ल्यानंतर साबरमती हॉस्टेलच्या दोन वार्डनने राजीनामा दिला आहे. आम्ही विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकलो नाही, असं सांगत राम अवतार मीणा आणि प्रकाश साहू यांनी राजीनामा दिला. जेएनयूमध्ये मास्कधारी हल्लेखोरांचा धुमाकूळ जेएनयूमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. हातात लाठ्या-काठ्या, रॉड, हॉकी स्टिक, दगड घेऊन मास्क घालून आलेल्या हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. सुमारे पाच तास हा राडा सुरु होता. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषसह अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला झाला. डोकं, हात, पायाच्या गंभीर जखमांसह दोन डझनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. अभाविपने हल्ला केल्याचा आरोप डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी केला. तर अभाविपने डाव्या संघटनांवर आरोप केला.संबंधित बातम्या
JNU Protest | गेट वे ऑफ इंडियावरुन आझाद मैदानात हलवल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन मागे
JNU Attack | जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून आखली रणनीती?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement