एक्स्प्लोर

Delhi Crime: मित्राची हत्या केली, स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला; अखेर 20 वर्षांनंतर टीप मिळाली अन् नौदल अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Delhi Murder: मित्राची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या नौदल अधिकाऱ्याला पोलिसांनी मृत घोषित केलं होतं. 20 वर्षांनंतर एक टीप मिळाली आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडला. 

Delhi Murder : दिल्ली पोलीस एका अत्यंत धक्कादायक खून प्रकरणाचे गूढ उकलण्याचा (Delhi Murder) प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी हा नौदलाचा माजी कर्मचारी असून त्याला 20 वर्षांपूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते. आरोपी अनेक वर्षांपासून आपली ओळख बदलून दिल्लीत राहत होता. त्याच्यावर खुनासोबतच चोरीचाही आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेश कुमार असे अटक आरोपीचे नाव असून तो हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहे. 2004 मध्ये त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला तब्बल 20 वर्षांनंतर मृत घोषित करण्यात आलेल्या फरार आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे. आरोपीचे नाव 2004 च्या एका खुनाच्या गुन्ह्यात असून त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल आहे.

आरोपी सापडला कसा? 

बवाना येथील हत्या आणि एका प्रकरणात चोरीचा आरोप असलेला बालेश कुमार हा दिल्लीतील नजफगढ भागात अमन सिंग नावाने राहत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बालेश कुमारला नजफगड येथून अटक केली.

पोलिस चौकशीत आरोपीने काय सांगितले?

पोलिस चौकशीत आरोपी बालेश कुमारने सांगितले की, 2004 मध्ये दारूच्या नशेत त्याने आणि त्याचा भाऊ सुंदर लालने राजेश नावाच्या व्यक्तीची हत्या करून मृतदेह बवाना परिसरात फेकून दिला होता. या हत्येप्रकरणी बालेशच्या भावाला अटक झाली होती आणि बालेश फरार झाला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी बालेश कुमार हा त्याचा भाऊ सुंदर लाल आणि राजेशसोबत दारू पीत होता. त्याचवेळी बालेश कुमारचे राजेश कुमारच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध आणि पैशाच्या व्यवहारावरून भांडण झाले. त्यावेळी आरोपी बालेश कुमार आणि सुंदर लाल यांनी राजेशची गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह दिल्लीतील बवाना पोलीस स्टेशन परिसरात फेकून दिला.

आरोपीला मृत कसे घोषित केले?

क्राईम ब्रँचच्या चौकशीदरम्यान जोधपूरमध्ये एका ट्रकला आग लागून त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एक बालेश कुमार असल्याचे घोषित केले होते. एवढेच नाही तर बालेश कुमारच्या पत्नीला विम्याची रक्कमही मिळाली असल्याचं समोर आलं आहे. 

बनावट कागदपत्रे बनवून ओळख बदलली

बालेश कुमारने रोशन गार्डन, नजफगढ येथील रहिवासी अमन सिंग अशी आपली नवीन ओळख निर्माण केली आणि बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स तयार करून बँक ऑफ इंडियामध्ये बँक खाते उघडले असेही तपासात उघड झाले आहे. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

ही बातमी वाचा : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog: अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी
CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
SIP : 5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, तज्त्र काय म्हणतात जाणून घ्या?
5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, जाणून घ्या समीकरण
Labour Codes : एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report
Pune News : पुण्यातल्या मन सुन्न करणाऱ्या कहाणीचं पुढचं पान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog: अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog: अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी
CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
SIP : 5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, तज्त्र काय म्हणतात जाणून घ्या?
5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, जाणून घ्या समीकरण
Labour Codes : एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
Rishabh Pant : दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या जागी कोणाला संधी देणार? पत्रकारांचा प्रश्न कॅप्टन रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
शुभमन गिलच्या जागी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत कोणाला संधी देणार? रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
Ram Mandir :  श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
IND A vs BAN A : भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये जितेश शर्माचे दोन निर्णय चुकले, बांगलादेश अंतिम फेरीत
भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेश विजयी, जितेश शर्माचं काय चुकलं
Tejas Fighter Jet Crashed: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Video: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Embed widget