एक्स्प्लोर

Mumbai Murder : जावयाचा गळा चिरला, मुलीचा गळा आवळला, आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून हत्या; गोवंडी दुहेरी हत्याकांडाची उकल 

Mumbai Murder In Love Marriage : मुलीने घरच्यांच्या इच्छेविरोधात लग्न केल्यानंतर वडिलांनी मुलगा आणि त्याच्या तीन अल्पवयीन मित्रांच्या मदतीने तिची आणि तिच्या नवऱ्याची हत्या केली.  

मुंबई: गोवंडी पोलिसांना दुहेरी हत्येची उकल (Govandi Murder Case) करण्यास यश मिळालं आहे. आंतरधर्मीय लग्न केल्यामुळे नाराज झालेल्या वडिलांनीच आपल्या मुलीची आणि जावयाची हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणात वडील, भाऊ आणि भावाच्या मित्राला अटक करण्यात आली असून तीन अल्पवयीन मुलांनादेखील ताब्यात घेण्यात आलं आहे. 

करण चंद्र ( वय 22) आणि गुलनाज खान ( वय 20)  यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाला प्रेमविवाह झाला होता. मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न  केलं होतं. आंतरधर्मीय विवाह असल्याने मुलीच्या वडिलांचा त्याला विरोध होता. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी म्हणजे  गोरा खान यांनी आणि मुलीच्या भावाने त्या दोघांचीही हत्या केली होती.  जावयाचा गळा चिरला होता तर मुलीचा गळा आवळून खून केला होता. नंतर मुलीचा मृतदेह हा खारघरमध्ये सापडला होता. 

मुलीने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन हिंदू मुलाशी लग्न केले होते. याचा राग येऊन मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांची हत्या करून मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते. पोलिसांना प्रथम मुलाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा उलगडा झाला असता आरोपींच्या चौकशीत दुसरा मृतदेहही सापडला. अशा प्रकारे पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला आहे.

मुंबईतील गोवंडी पोलीस स्टेशन परिसरात 14 ऑक्टोबर रोजी एका तरुणाचा अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृत व्यक्तीचे वय 20 ते 22 वर्षे दरम्यान असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं. त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या झोन-6 चे डीसीपी हेमराज राजपूत यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके तयार केली होती. तपास पथकांनी मृताची ओळख 22 वर्षीय करण रमेश चंद्र अशी केली. करण हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहितीही समोर आली आहे. 

पोलीस चौकशी सुरू केली असता त्या युवकाने नुकतेच प्रेमविवाह केल्याचे निष्पन्न झाले. त्याची पत्नीही बेपत्ता होती. या तपासादरम्यान पोलिसांनी मुलीचे वडील गोरा रईसुद्दीन खान (वय 50 वर्षे) याची चौकशी केली. संपूर्ण तपासात गोरा खान हा या हत्येतील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे.

इच्छेविरुद्ध लग्न, त्यामुळे गुलनाजनचा खून केला

या घटनेत गोरा खानचा मुलगा सलमान गोरा खान (वय 22 वर्षे) आणि त्याचे तीन अल्पवयीन मित्र सामील असल्याचे पोलिसांना समजले. गोरा खानची मुलगी गुलनाज हिच्याबद्दल चौकशी केली असता तिची हत्या झाल्याचे उघड झाले. गुलनाजने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध करण या हिंदू धर्मातील मुलाशी लग्न केले होते. गेल्या वर्षीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता. आतापर्यंत गोरा रईसुद्दीन खान, त्याचा मुलगा सलमान गोरा खान आणि त्याचा मित्र मोहम्मद कैफ नौशाद खान यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यासोबतच हत्येमध्ये सहभागी असलेल्या ३ अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ही बातमी वाचा: 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget